Petrol Diesel Price: सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा मोहोल आहे त्यामुळे आपल्यालाही (Summer Holidays) आता पिकनिकची हवा लागली आहे. बाहेर मस्त अवकाळी पावसामुळे गार असं ढगाळ वातावरणही आहे. परंतु आपली गाडी काढून जर का बाहेर जाण्याचा प्लॅन असेल तर तुम्हाला पेट्रोल भरणं तर आवश्यक आहेच. पेट्रोल पंपावर पेट्रोल (Petrol and Diesel Price Today) डिझेलच्या किमती वाचून तुम्ही मात्र आता फार शॉक होणार नाही. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कालप्रमाणे आजही काहीच बदल झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून हे दर जसेच्या तसेच आहेत.
गुडरिटर्न्सच्या वेबसाईटनुसार, काल पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फारशी वाढ झालेली नाही. त्यातून आजही पेट्रोलचे दर हे जैसे थे आहेत. काल पेट्रोलची किंमत ही 106.31 रूपये प्रति लीटर इतकी होती आजही पेट्रोलचे दर हे तेवढेच आहेत. तर डिझेल 94.27 रूपये प्रति लीटर इतके आहे. त्यामुळे अद्याप तरी पेट्रोलच्या दरातमध्ये किंवा डिझेलच्या दरामध्ये वाढ झालेली नाही. तेव्हा आज जर का कुठे आऊटिंगचा प्लॅन असेल तर बिनधास्तपणे तुम्ही जाऊ शकता.
गुडरिटर्न्सनुसार, सोलापूरमध्ये पेट्रोलची किंमत106.92 रूपये प्रति लीटर आहे. तर सांगलीमध्ये पेट्रोलची किंमत (Petrol and Diesel Price in Maharashtra) ही 106.51 रूपये प्रति लीटर एवढी आहे. रत्नागिरीमध्ये पेट्रोलचे दर हे 107.85 रूपये प्रति लीटर तर पुण्यात पेट्रोलची किंमत ही 106.61 रूपये प्रति लीटर इतकी आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचे दर हे 106.42 रूपये प्रति लीटर इतके असून नागपूर येथे पेट्रोलचे दर हे 106.07 रूपये प्रति लीटर इतके आहेत. कोल्हापूर येथे हे दर 106.75 रूपये प्रति लीटर आहेत.
भारत देश हा प्रामुख्यानं कच्च्या तेलाच्या (Crude Oil) गरजांसाठी इतर देशांवर अवलंबून आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या कच्च्या तेलाच्या किमतीवर ठरते. जर का आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाला मागणी प्रचंड आहे. त्यातून जर का काही भौगोलिक कारणं कच्च्या तेलाच्या किमती वाढविण्यास कारणीभूत ठरली तर त्याचा परिणाम हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्येही होईल. त्यामुळे भारतात इंधनाच्या किमती ठरविण्यासाठी आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती या महत्त्वाची भुमिका बजावतात.
कच्च्या तेलाचे भाव वाढण्यासाठी सर्वात मोठी गोष्ट कारणीभुत ठरली आणि ती म्हणजे रशिया - युक्रेन युद्ध. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाचे भाव वाढले आणि त्याचे पर्यवसन म्हणून मागील वर्षी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली होती. रशिया हा जगात कच्च्या तेलाचा सर्वात मोठा उत्पादक आहे.