मुंबई : पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरामुळे सामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत वाढ होत आहे. अगदी या इंधनांच्या दरांनी मोठी उंची गाठली आहे. देशातील अनेक शहरात पेट्रोलच्या दराने कधीच शंभरी पार केली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे घरगुती इंधनात आणि पेट्रोल-डिझेलमध्ये वाढ झाली आहे. इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी इंधनाच्या दरात कोणताच बदल झालेला नाही. आज तिसरा दिवस आहे ज्या दिवशी पेट्रोल-डिझेलचा दर स्थिर आहेत.
जुलै महिन्यात आता पेट्रोलच्या दरात एकूण 9 वेळा वाढ झाली आहे. डिझेल पाच वेळा महागलं आणि एक वेळा स्वस्त झालं आहे. याच्या अगोदर जून आणि मे महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर जवळपास 16-16 वेळा दरवाढ झाली आहे.
देशात सर्वाधिक महागडं पेट्रोल आणि डिझेल हे राजस्थानच्या गंगानगर आणि मध्य प्रदेशच्या अनुपपूरमध्ये मिळतं. गंगानगरमध्ये पेट्रोलचा दर 113.21 रुपये आणि डिझेलचे दर 103.15 रुपयांवर मिळत आहे. अनुपपूरमध्ये आजचा पेट्रोलचा दर 112.78 रुपये आणि डिझेलचा दर 101.15 रुपये आहे.
देशातील 17 राज्यात पेट्रोल का भाव 100 रुपये प्रति लीटर किंवा त्याहून अधिक झाले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगना, लडाख, जम्मू कश्मीर, ओडिसा, तमिळनाडु, बिहार, केरळ, पंजाब, सिक्किम, पुड्डुचेरी , दिल्ली आणि पश्चिम बंगाल येथे दर वाढले आहे. भोपाळमध्ये 100 रुपये पेट्रोलचा दर आहे.