आपण आपले FDचे पैसे काढण्यास विसरलात? ही चूक पडेल महाग! RBIने बदलले नियम

एफडीचे नियम बदलले आहेत. (FD Rules Changed) मुदत ठेवीच्या मुदतीनंतर पैसे काढले गेले नाहीत तर तुम्हाला याचा फटका बसणार आहे. याबाबतचे नियम बदलले गेले आहेत.

Updated: Jul 20, 2021, 08:12 AM IST
आपण आपले FDचे पैसे काढण्यास विसरलात? ही चूक पडेल महाग! RBIने बदलले नियम  title=

मुंबई : FD Rules Changed: बचत करण्यासाठी तुम्हीदेखील मुदत ठेवींमध्ये पैसे ठेवले तर आता तुम्हाला थोडे शहाणपणाने वागावे लागेल. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एफडीच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत, ज्याची तुम्हाला माहिती असावी, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते.

FD मुदत ठेवमधील नियमात बदल

वास्तविक, RBIने फिक्स्ड डिपॉझिटच्या (FD) नियमात मोठा बदल केला आहे की, आता मुदत ठेवीनंतर जर तुम्ही रकमेचा क्लेम न घेतल्यास तुम्हाला त्यावरील व्याज कमी मिळेल. (Changed rules on maturity of FD) हे व्याज बचत खात्यावर प्राप्त झालेल्या व्याजापेक्षा समान असेल. सध्या बँका सहसा 5 ते 10 वर्षांच्या दीर्घ कालावधीसह एफडीवर 5 टक्क्यापेक्षा जास्त व्याज देतात. तर बचत खात्यावर व्याजदर सुमारे 3 टक्के ते 4 टक्के आहेत.

आरबीआयने हा आदेश जारी केला

RBIने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, जर फिक्स्ड डिपॉझिट मुदतठेव पूर्ण झाली आणि रक्कम भरली काढली नाही किंवा दावा केला नसेल तर बचत खात्यानुसार त्यावरील व्याज दर किंवा मॅच्युरिंग एफडीवरील निश्चित व्याज दर आणि जे काही दर कमी आहे, ते दिले जातील. सर्व वाणिज्य बँका, लघु वित्त बँक, सहकारी बँका, स्थानिक प्रादेशिक बँकांमधील ठेवींवर हे नवीन नियम लागू होतील.

हे अशा प्रकारे समजून घ्या 

समजा तुम्हाला आज 5 वर्षांची मुदत असलेली एफडी केली आहे. जी आज तिची मुदत पूर्ण झाली आहे, परंतु आपण हे पैसे काढले नाही तर यावर दोन परिस्थिती उद्भवतील. जर एफडीवरील व्याज त्या बँकेच्या बचत खात्यावरील व्याजापेक्षा कमी असेल तर आपल्याला एफडीवर व्याज मिळणे सुरूच राहील. बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा एफडीवर मिळणारे व्याज जर मुदतपूर्ण झाल्यानंतर बचत खात्यावर व्याज मिळेल.

हा जुना नियम होता

पूर्वी, जेव्हा आपली एफडी मुदतपूर्ण होते आणि आपण पैसे काढले नाहीत किंवा दावा केला नसेल तर आपण ज्या कालावधीसाठी एफडी केली त्या कालावधीसाठी बँक आपली एफडी वाढवत असे. पण आता तसे होणार नाही. परंतु आता जर मॅच्युरिटीवर पैसे काढले गेले नाहीत तर एफडी व्याज त्यावर मिळणार नाही. तर आपण मॅच्युरिटीनंतर ताबडतोब पैसे काढले तर चांगले होईल.