Petrol-Diesel price:पेट्रोल-डिझेलची किंमत पाहा, आज किती रुपयांनी स्वस्त झाले इंधन तेल

 Petrol-Diesel price today:पेट्रोलियम कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे. 

Updated: Mar 30, 2021, 08:21 AM IST
Petrol-Diesel price:पेट्रोल-डिझेलची किंमत पाहा, आज किती रुपयांनी स्वस्त झाले इंधन तेल title=
संग्रहित फोटो

मुंबई : Petrol-Diesel price today:पेट्रोलियम कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी होळीच्या दुसर्‍या दिवशी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्याची घोषणा केली आहे. 30 मार्च 2021 रोजी पेट्रोलच्या किंमतीत 22 पैसे आणि डिझेलच्या किंमतीत 23 पैसे कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या कपातीनंतर दिल्लीत पेट्रोलची किंमत 90.56 रुपये आहे तर डिझेलची किंमत प्रति लिटर 80.87 रुपये आहे. त्याचबरोबर मुंबईतील पेट्रोलची किंमत 96.98 रुपये आणि डिझेलची किंमत प्रतिलिटर 87.96  रुपये झाली आहे.

आज आपल्या शहरातील दर काय ?  (Know here what is the rate in your city today)

दिल्लीमध्ये  (Delhi) पेट्रोल 90.56 रुपये आणि डिझेल 80.87 रुपये प्रति लीटर आहे.
मुंबईमध्ये  (Mumbai) पेट्रोल 96.98 रुपये आणि डिझेल 87.96  रुपये प्रति लीटर झाले आहे.
कोलकातामध्ये  (Kolkata) पेट्रोल 90.77 रुपये आणि डिझेल 83.75 रुपये प्रति लीटर आहे.
चेन्नईमध्ये  (Chennai) पेट्रोल 92.58  रुपये आणि डिझेल 85.88 रुपये प्रति लीटर झाले आहे.

दररोज सकाळी किमतीत बदल (Prices change every morning)

तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल करत असतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे (कच्चे तेल) दर काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले तर तेव्हापासून ते आतापर्यंत सुमारे 7 रुपयांनी पेट्रोल महाग झाले आहे. त्याचप्रमाणे डिझेलही प्रति लिटर 7.60 रुपयांनी महाग झाले आहे.

 दर कसे जाणून घेऊ शकता? (How to check rates)

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईल ग्राहकांच्या किंमती जाणून घेण्यासाठी दिल्ली येथे मेसेज बॉक्समध्ये टाइप करा- RSP 102072 (RSP <space>Dealer Code of Petrol Pump आणि 9224992249 या क्रमांकावर पाठवा. त्याचप्रमाणे मुंबईसाठी RSP 108412, कोलकातासाठी RSP 119941 आणि चेन्नईसाठी RSP 133593 टाइप करा आणि 9224992249 क्रमांकावर पाठवा. असे केल्याने आपल्या मोबाइलवर आपल्याला नवीन दर मिळतील.