अमेरिका-इराणमध्ये तणाव, भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले

अमेरिका-इराणमध्ये वाढत चाललेल्या तणावामुळे भारतात पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत.

Updated: Jan 7, 2020, 11:11 AM IST
अमेरिका-इराणमध्ये तणाव, भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले title=

मुंबई : अमेरिका-इराणमध्ये वाढत चाललेल्या तणावामुळे भारतात पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. मंगळवारी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचे भाव ५ पैसे प्रति लीटरने वाढले. तर दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये डिझेल ११ पैशांनी आणि मुंबईत १२ पैशांनी वाढलं.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार मुंबईमध्ये पेट्रोल ८१.३३ रुपये आणि डिझेल ७२.१४ रुपये प्रती लीटर आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल ७५.७४ आणि डिझेल ६८.७९ रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यामध्ये पेट्रोल ७८.३३ रुपेय आणि डिझेल ७१.१५ रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल ७८.६९ रुपये आणि डिझेल ७२.६९ रुपये लीटर आहे.

इराण आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढल्यामुळे कच्च्या तेलाचा आयात खर्च वाढला आहे, त्यामुळे घरगुती बाजारात इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. भारतात कच्च्या तेलाच्या आयातीचा खर्च ५१,००० कोटी रुपयांपेक्षा जास्तने वाढू शकतो.

आखाती देशांमधल्या तणावपूर्ण वातावरणामुळे मागच्या आठवड्यापासून इंधन आणि सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांमध्ये इंधनाचे दर कमी व्हायची शक्यता कमी आहे, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.