Petrol and Diesel Latest Price: पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरासंबंधी दिलासा मिळालेला नाही. दरम्यान, 24 जुलैचे पेट्रोल आणि डिझेल दर जारी करण्यात आले आहेत. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणता बदल झालेला नाही. 24 जुलैलाही डिझेल आणि पेट्रोलचे दर स्थिर आहेत. देशातील तेलकंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दराची माहिती देत असतात.
22 मे 2023 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केलेला नाही. 24 जुलैलाही पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच देशात पेट्रोल 15 रुपये प्रती लिटर दराने मिळाले असा दावा केला होता. पण याची अंमलबजावणी कधी होणार यासंबंधी मात्र अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
दिल्लीबद्दल बोलायचं झाल्यास राजधानीत पेट्रोलचा दर 96.72 प्रति लिटर आणि डिझेल 89.62 प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 तर डिझेलचा दर 94.27 प्रतिलिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 102.63 तर डिझेलचा दर 94.24 प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 आणि डिझेल 92.76 प्रति लिटर आहे.
शहर पेट्रोल डिझेल
बंगळुरु 101.94 87.89
लखनौ 96.57 89.76
नोएडा 96.79 89.96
गुरुग्राम 97.18 90.05
चंदीगड 96.20 84.26
पाटणा 107.24 94.04
दर दिवशी सरकारी कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले जातात. तुम्ही अगदी घरच्या घरी बसूनही हे दर तपासू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक एसएमएस करावा लागणार आहे. तुम्ही HPCL चे ग्राहक असाल तर, HPPRICE <डीलर कोड> लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवा. इंडियन ऑईलचे ग्राहक असाल तर, RSP<डीलर कोड> लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवा आणि बीपीसीएल (BPCL) चे ग्राहक असाल तर, <डीलर कोड> लिहून 9223112222 या क्रमांकावर पाठवा.