'या' राज्यात आज रात्री १२ वाजल्यापासून वाढणार पेट्रोल-डिझेलचे दर

पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधन दरात वाढ सुरुच असल्याचं पहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे पेट्रोलचा दर ८० रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 28, 2018, 12:54 PM IST
'या' राज्यात आज रात्री १२ वाजल्यापासून वाढणार पेट्रोल-डिझेलचे दर title=

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधन दरात वाढ सुरुच असल्याचं पहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे पेट्रोलचा दर ८० रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत.

मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लीटर ८० रुपयांवर पोहोचला आहे. त्यासोबतच इतर राज्यांतही पेट्रोलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. आता मध्य प्रदेशातही पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ होणार आहे.

हे पण पाहा: अशा प्रकारे ३१ रुपयांचं पेट्रोल तुम्हाला मिळतयं ७९ रुपयांत

मध्य प्रदेशात पेट्रोल-डिझेलवर सोमवारपासून अतिरिक्त कर (सेस) लागू होणार आहे. त्यामुळे रविवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात एक टक्क्याने वाढ होणार आहे. मध्य प्रदेश सरकारने यासदंर्भात अधिसूचना काढली आहे. 

जानेवारी महिन्यात केली होती घोषणा

मध्य प्रदेश कॅबिनेटने जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पेट्रोल-डिझेलवर सेस लावण्याची घोषणा केली होती. याआधी सेस केवळ ५० पैसे प्रति लीटर लावण्याचं बोललं जात होतं. मात्र, आता प्रत्येक लिटरवर सेस टक्क्याने लावला जाणार आहे. म्हणजेच रविवारी रात्री १२ वाजल्यापासून एक टक्क्याने सेस लावला जाईल.

हे पण पाहा: या पाच देशांत मिळतं सर्वात स्वस्त पेट्रोल

शनिवारी मध्य प्रदेश सरकारने अधिसूचना काढली आहे. त्यानुसार २९ जानेवारीपासून सेस लागू करण्यात येणार आहे. २८ डिसेंबरच्या रात्री १२ वाजल्यापासून पेट्रोल-डिझेलचे दर ठरवतील. त्यानंतर त्यावर मध्य प्रदेश सरकार एक टक्क अतिरिक्त सेस लावेल.

का वाढत आहेत पेट्रोल-डिझेलचे दर?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत आहे. त्यासोबतच डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला आहे. या सर्वांच्या परिणामामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे.

पेट्रोल प्रति लीटर ८५ रुपये होणार?

मॉर्गन स्टेनली आणि बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने २०१८ साठी कच्च्या तेलाच्या सरासरी भावानुसार अंदाजात वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्यच्या तेलाच्या दराने यापूर्वीच ३ वर्षांचा उच्चांक गाठला आहे. तज्ञांच्या मते, पेट्रोलच्या दरात वाढ होऊन ८५ रुपये प्रति लीटर होण्याची शक्यता आहे.