आता लग्नात तुम्हाला घोड्यावर स्वार होणं कठीण, पाहा यावर PETAचं म्हणणं काय?

काही लोकांनी पेटा रद्द करण्याची मागणी देखील केली आहे, तर काही लोक पेटाला कट्टरवादी म्हणत आहेत.

Updated: Oct 12, 2021, 07:00 PM IST
आता लग्नात तुम्हाला घोड्यावर स्वार होणं कठीण, पाहा यावर PETAचं म्हणणं काय? title=

मुंबई : PETA म्हणजे पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ ऍनिमल्स हे जनावरांसाठी काम करते. सोमवारी त्याच्या ट्विटर हँडलने ट्विट केले की, विवाह समारंभात घोडीचा वापर करणे अपमानास्पद आणि क्रूर आहे. या ट्विटने सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे. त्यानंतर काही लोकं PETA च्या विरोधात उग्र ट्विट देखील करत आहेत. ज्यामुळे आज PETA ट्विटरवर ट्रेंड करत आहे.

काही लोकांनी पेटा रद्द करण्याची मागणी देखील केली आहे, तर काही लोक पेटाला कट्टरवादी म्हणत आहेत. त्याच वेळी, काही लोक म्हणतात की, PETA ला बकरी ईदच्या दिवशी बकऱ्यांची कत्तल करताना दिसत नाही? जे लग्नात घोडा वापरण्यावरती आक्षेप घेत आहेत.

सर्वप्रथम तुम्ही PETA चे ट्विट पाहा

PETA अर्थात पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ ऍनिमल्सने ट्विटर हँडलवर सोमवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास लिहिले, 'लग्न समारंभात घोडीचा वापर करणे हे अपमानजनक आणि क्रूर आहे.' तेव्हापासून पेटावर लोकांनी शब्दांचा हल्ला करायला सुरूवात केली आहे. काही लोकांनी PETA ला हिंदूविरोधी म्हटले आणि काही लोकांनी PETA वर बंदी घातली पाहिजे असे देखील म्हटले आहे.

सीबीआयच्या माजी संचालकांनी पेटाला फ्रॉड म्हटले आहे

सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी आणि सीबीआयचे माजी संचालक एम नागेश्वर राव यांनी लिहिले की, फ्रॉड पेटा कंपनी ही एक कायद्यांतर्गत नोंदणीकृत धर्मादाय कंपनी आहे. ही एक चॅरिटेबल कंपनी आहे असं भासवते, परंतु या कंपनीचे हिंदूविरोधी आणि भारतविरोधी ध्येय आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना टॅग करून, त्यांनी लिहिले की, कंपनीची कायद्याच्या कलम 8 अंतर्गत नोंदणी त्वरित रद्द करावी.

पेटा कट्टरवादी आहे का?

पत्रकार राहुल रोशन ट्विटरवर PETAला रिट्विट करताना लिहितो, "ज्या युगात दलित नवरदेवही आग्रह करत होते की, ते सुद्धा घोड्यावर स्वार होतील, तेव्हा पेटा आता आता हे काही तरी नवीन घेऊन आला आहे. काय PETA गुप्तपणे कट्टरवादी आहे का?" त्यांनी आपल्या ट्विटमध्ये काँग्रेस नेते उदित राज यांनाही टॅग केले आहे.

PETAला प्राण्यांचे दंश दिसत नाहीत?

सपना मदन नावाचा एक ट्विटर वापरकर्ता लिहितो, घोडेस्वारी क्रूर आहे, पण सणांमध्ये प्राण्यांची हत्या करणे क्रूर नाही. मी खूप पूर्वी PETA ला देणगी देणे बंद केले याचा मला आनंद आहे.

PETAच्या ट्विटवर असे प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिली वेळ नाही. प्राण्यांवरील क्रूरता थांबवण्याच्या उद्देशाने, PETA सतत ट्विट करत राहतो. परंतु लोकं काही कमी नाहीत ते देखील आपल्या पद्धतीने PETAचे क्लासेस घेत राहातात आणि आपल्या स्टाईलने उत्तरं देतात.

PETAने अमूलला शाकाहारी दुधाकडे जाण्यास सांगितले

काही महिन्यांपूर्वी, PETAने अमूलला शाकाहारी दुधाकडे जाण्याची सूचना केली. तेव्हा अमूलने म्हटले होते की, परदेशी निधीद्वारे चालवल्या जाणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी भारतीय दुग्ध उद्योग उध्वस्त करण्यापासून परावृत्त केले पाहिजे.