प्रियांका गांधी संतापल्यात, धक्का मारायचा असेल तर घरी जा!

प्रियांका गांधी चांगल्याच संतापल्यात. त्यांनी खडेबोल सुनावलेत.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 13, 2018, 12:17 PM IST
प्रियांका गांधी संतापल्यात, धक्का मारायचा असेल तर घरी जा!  title=

नवी दिल्ली : देशात कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे. काँग्रेसनेही याचा निषेध केलाय.सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मध्यरात्री इंडिया गेटवर कँडल मार्च काढण्यात झाला. यावेळी या मार्चमध्ये राहुल यांच्या भगिनी प्रियांका गांधी - वढेराही सहभागी झाल्या होत्या. यावेळी धक्काबुक्की झाल्याने प्रियांका गांधी चांगल्याच संतापल्यात. त्यांनी कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावलेत. जर धक्काबुक्की करायची असेल तर घरी जाऊन बसा. येथे आलात आहात तर शांततेत चला, असा दम भरताना चांगलेच झापले.

 मध्यरात्री इंडिया गेटवर कँडल मार्च 

कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मध्यरात्री इंडिया गेटवर कँडल मार्च काढण्यात आला. मानसिंग रोडपासून इंडिया गेटपर्यंत हा कँडल मार्च काढण्यात आला. कठुआ आणि उन्नावमध्ये घडलेल्या घटनांमुळे व्यथित झाल्याचं सांगत महिलांबाबत अशी वागणूक खपवून घेतली जाणार नाही असं राहुल गांधींनी ठणकावून सांगितले. यावेळी मोर्चाला मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी धक्काबुक्कीचा प्रकार घडला. याचा त्रास प्रियांका गांधी यांनाही सहन करावा लागला. त्यामुळे धक्काबुक्की‬वर प्रियांका गांधी भडकल्यात आणि त्यांनी कार्यकर्त्याना फटकारले‬.

 निर्भयाचे आई-वडीलही सहभागी

काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियांका यांचा रौद्रअवतार पाहताच चिडीचूप झालेत. तुम्ही येताय तर शांततेत चला, धक्का मारायचा असेल तर घरी जाऊन बसा‬, असा सल्लाही दिला. दरम्यान, तसेच प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते राहुल गांधींच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरले. निर्भयाचे आई-वडीलही या मोर्च्यात सहभागी झाले होते.  


‪ 

तीव्र दु:ख व्यक्त

राहुल गांधी यांनी कठुआ आणि उन्नाव येथे घडलेल्या घटनांबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले होते. तशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या दोन्ही घटनांच्या निषेध करण्यासाठी आणि पीडितांना न्याय मिळण्यासाठी इंडिया गेटवर शांततापूर्ण कँडल मार्च काढण्यात येईल अशी माहिती त्यांनी ट्विट करत दिली होती. या मोर्च्यात अशोक गेहलोत, कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद, दिग्विजय सिंग, अंबिका सोनी, गुलाम नबी आझाद, नफीसा सोनीसारखे काँग्रेसचे दिग्गद नेतेही सहभागी झाले होते.