मुंबई : बाबा रामदेव यांची कंपनी पतंजलिने बीएसएनएलसोबत मिळून पतंजलि-बीएसएनएल स्वदेशी समृद्धी सिम लाँच केल्यानंतर आता मेसेजिंग अॅप लाँच करणयात आलेय. पतंजलि-बीएसएनएल सिम सध्या केवळ पतंजलिच्या कर्मचाऱ्यांसाठी लाँच करण्यात आलेय. येणाऱ्या काळात इतरांसाठीही ते लाँच केले जाणार आहे. आता पतंजलिने व्हॉट्सअॅपला टक्कर देणयासाठी किंभो नावाचे मेसेजिंग अॅप लाँच केलेय. या अॅपचे टॅगलाईन आहे अब भारत बोलेगा.
किंभो अॅप तुम्ही गुगल अॅप स्टोरवरुन डाऊनलोड करु शकता. एएनआय डिजीटलच्या माहितीनुसार पतंजलिचे प्रवक्ता एसके तिजारावालाने ट्विट करुन याबाबत माहिती दिली. सिम कार्ड लाँच केल्यानंतर बाबा रामदेव यांनी मेसेजिंग अॅपही लाँच केलेय. गुगल प्ले स्टोरवरुन याला डाऊनलोड करता येणार.
Yoga guru Ramdev launched a new messaging application called Kimbho under his flagship company Patanjali today. Patanjali's spokesperson, SK Tijarawala claimed that the app will give WhatsApp a tough competetion
Read @ANI Story | https://t.co/KyxhQC21dG pic.twitter.com/N8YzJgb7bZ
— ANI Digital (@ani_digital) May 30, 2018
मेसेजिंग अॅप किंभो हे इस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपला जोरदार टक्कर देऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात कोणते अॅप सरस ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या सिममध्ये १४४ रुपयांचे रिचार्ज केल्यास युझरला देशभरात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यासोबचच २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधाही मिळणार आहे. हे सिम सध्या केवळ पतंजलिच्या कर्मचाऱ्यांसाठी लाँच करण्यात आलेय. मात्र जेव्हा हे सगळ्यांसाठी लाँच करण्यात येईल तेव्हा या सिम कार्डद्वारे युझरला पतंजलिच्या उत्पादनांवर १० टक्के सूट देण्यात येणार आहे. इतकंच नव्हे तर सिमचा वापर करणाऱ्या युझरला २.५ लाखापर्यंतचा मेडिकल इन्श्युरन्स मिळणार आहे. तसेच ५ लाखापर्यंतचा लाईफ इन्श्युरन्स मिळणार आहे.