संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर

अनेक राजकीय पक्षांच्या नजरा लागून राहिलेल्या संसदेचं हिवाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 

Updated: Nov 24, 2017, 11:40 AM IST
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर title=

नवी दिल्ली : अनेक राजकीय पक्षांच्या नजरा लागून राहिलेल्या संसदेचं हिवाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. हिवाळी अधिवेशन यंदा पंधरा डिसेंबरला सुरू होणार आहे. हे अधिवेशन पाच जानेवारीपर्यंत चालेल. 

गुजरात निवडणूकीत दुसऱ्या टप्प्याचं मतदान १४ डिसेंबरला पूर्ण होईल. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी अधिवेशऩाला सुरूवात होणार आहे. जीएसटी, नोटाबंदी अशा अडचणीच्या मुद्द्यांवर संसदेत उत्तर विचारली जातील. त्यामुळे निवडणूकीत नुकसान होईल या भीतीनं हिवाळी अधिवेशच्या तारखा मुद्दाम पुढे ढकलल्या जात असल्याचा आरोप विरोधकांनी आधीच केलाय. 

पण त्याला उत्तर देताना आज संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी निवडणूक आणि अधिवेशनाच्या तारखा एकच होऊ नयेत यासाठी अधिवेशन १५ डिसेंबरला ठेवण्यात आल्याचं म्हटलंय.

दरम्यान, या हिवाळी अधिवेशनात विरोध भाजपला विविध मुद्द्यांवरून घेरण्यासाठी तयार आहेत. भाजपच्या अनेक योजनांचा उडालेल्या फज्ज्यामुळे हे हिवाळी अधिवेशन चांगलच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.