ग्लुकोज बिस्किट महागण्याची शक्यता

  आजारपणाच्या दिवसात असो किंबा अगदी चहा आणि पाण्यासोबत 'ग्लुकोज' चं बिस्किट बुडवून खाण्याची मज्जा  काही औरच असते. 

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Dec 17, 2017, 10:50 PM IST
ग्लुकोज बिस्किट महागण्याची शक्यता  title=

मुंबई :  आजारपणाच्या दिवसात असो किंबा अगदी चहा आणि पाण्यासोबत 'ग्लुकोज' चं बिस्किट बुडवून खाण्याची मज्जा  काही औरच असते. 

प्रत्येकाच्या खिशाला पडवणारं हे पोटभरीचं बिस्किट भारतात घराघरामध्ये आढळतेच. पण प्रत्येकाच्या खिशाला परवडणारं बिस्किट आता महागणार आहे. 

पहिल्या तिमाहीत होणार महाग  

बिस्किट आणि कनफेक्शनरी कंपनी पारले प्रोडक्टने २०१८ वर्षात पहिल्या तिमाहीत गुकोज, मारी आणि मिल्क बिस्कीटांची किंमत ४-५ % वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

बिस्किटांच्या किंमतींमध्ये किती वाढ होणार याबाबतचा निर्णय अजूनही झाला नसला तरीही सेवाशुल्क वाढल्यामुळे बिस्किटांच्या किंमती वाढणार असल्याची शक्यता आहे. 

जानेवारी ते मार्च दरम्यान 100 रूपये प्रति किलोग्राम पेक्षा कमी किंमतीतील वस्तूंवर 4-5 % ची वाढ होऊ शकते.  

किंमती वाढणार ? 

पारलेजी, बेकस्मिथ, इंग्लिश मारी आणि मिल्क शक्ती ब्रांडच्या बिस्कि टांच्या किंमतीत वाढ होऊ शकते. जीएसटीनंतर बिस्किटांच्या किंमतीमध्ये वाढ केली नाही.  

जीएसटीचा परिणाम 

जीएसटी नंतर १०० रूपये प्रतिकिलो पेक्षा कमी बिस्किटांमध्ये १८ % च्या जीएसटी आकारण्यात आला आहे. यापूर्वी  बिस्किटांवर उत्पादन शुल्क नव्हता. १०० रूपये प्रतिकिलो पेक्षा कमी पोषक बिस्किटांचा बाजार हा ९००० कोटींचा आहे.