नरेंद्र मोदींची 'परिक्षा पे चर्चा'

'चाय पे चर्चा'च्या धर्तीवर आता 'परीक्षा पे चर्चा' होणार आहे.

Updated: Feb 8, 2018, 10:43 PM IST
नरेंद्र मोदींची 'परिक्षा पे चर्चा' title=

नवी दिल्ली : 'चाय पे चर्चा'च्या धर्तीवर आता 'परीक्षा पे चर्चा' होणार आहे.

दहावी बारावीच्या बोर्डांच्या परीक्षांआधी. नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा करणार आहेत. १६ फेब्रुवारीला दिल्लीतल्या तालकोटरा स्टेडियममध्ये होणाऱ्या कार्यक्रमात मोदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

विद्यार्ऱ्यांनी परीक्षांचा ताण घेऊ नये, यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. मोदींनी विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करणारं पुस्तकही लिहिलंय.