नवी दिल्ली : कोरोनासारख्या जागतिक महामारीमुळे अनेक कुटूंब आर्थिक संकटात आहेत. अनेकांचा या महामारीने बळी घेतला आहे. अनेक परिवार असे आहेत की, जेथे आता फक्त म्हातारे आई-वडीलच आहेत. आणिबाणीच्या परिस्थितीमध्ये त्यांना आधार देण्यासाठी EPFOची पेंशन योजना लाभदायक ठरू शकते. (EPFO News Alert)
काय आहे पेंशन स्कीम?
EPFO पेंशन स्कीमची सुरूवात 1995 मध्ये झाली होती. नोकरी करताना निधन झालेला व्यक्ती कुटूंबात एकटाच कमावणारा असेल. तसेच त्याच्यावर त्याचे आई - वडील अवलंबून होते. अशावेळी म्हाताऱ्या आई-वडीलांच्या पाठीशी EPFO उभी राहते. EPFO च्या काही नियमांप्रमाणे आई-वडीलांना आजीवन पेंशन मिळते.
पेंशन योजनेच्या अटी?
EPFO ची पेंशन स्कीम अनुसार, जर नोकरी करताना नोकरदाराचा मृत्यू झाला, तसेच ती व्यक्ती आई-वडीलांचा एकमेव अधार असल्यास EPS -95 नियमाच्या अंतर्गत त्यांना आजीवन पेंशन मिळते.
यासाठी नोकरीचा कालावधी 10 वर्ष पूर्ण असायला हवा. तसेच कर्मचारी नोकरी दरम्यान, आजारी पडल्यास, तसेच शारीरिक अपंगत्व आल्यास कर्मचाऱ्यालादेखील आजीवन पेंशन मिळते. अशावेळी नोकरीचा कार्यकाळ 10 वर्षे पूर्ण झाला नसल्यासही या योजनेचा लाभ घेता येतो.
Benefits Payable to Parents/Nominee under EPS'95.#EPFO #SocialSecurity #HumHainNa #Pension #Services #पीएफ #ईपीएफओ #EPS #पेंशन #ईपीएफ pic.twitter.com/CGU3RUjsF1
— EPFO (@socialepfo) July 5, 2021
नोकरदाराच्या पगाराच्या 12 टक्के रक्कम PF फंडमध्ये जमा करावी लागते. तेवढीच रक्कम कंपनीतर्फेदेखील जमा केली जाते. निवृत्तीवेळी पूर्ण फंडचा पैसा व्याजासकट मिळतो.