'या' तारखेपासून Pan Card होईल Inactive, त्या आधी करा 'हे' काम

का होऊ शकतं Pan Card बंद आणि त्या आधी कोणतं काम करणं आहे गरजेच

Updated: Dec 11, 2022, 01:33 PM IST
'या' तारखेपासून Pan Card होईल Inactive, त्या आधी करा 'हे' काम  title=

PAN card will get inactive : गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला सुचना दिल्या जात आहेत की पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक करा. जर तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डला लिंक केलं नसेल तर त्याची शेवटची तारिख ही 31 मार्च 2023 पर्यंत लिंक करू शकता. या तारखेपर्यंत ज्यांनी असे केले नाही, त्यांचे पॅन कार्ड 1 एप्रिल 2023 नंतर Invalid असणार आहे. नुकतंच आयकर विभागानं ट्वीट करून लोकांना आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याचे आवाहन केले आहे . या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, प्राप्तिकर कायदा 1961 नुसार, जे लोक आर्थिक दुर्बल या श्रेणीमध्ये येत नाहीत त्यांनी 31 मार्च 2023 पूर्वी त्यांचे पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. (PAN-Aaadhaar linking)

पॅन कार्ड आधारशी लिंक करणे का आवश्यक आहे?

देशातील लोकांच्या आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी सरकार पॅन कार्डचा वापर करते. ते प्राप्तिकर विभागाद्वारे जरी करण्यात येत असले तरी हे इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे काम करते. एखाद्या व्यक्तीची किंवा कंपनीची सर्व कर संबंधित माहिती एकाच पॅन नंबरमध्ये नोंदवली जाते. PAN हा आर्थिक आणि करसंबंधी डेटा साठवण्याचे काम करते. हे कोणत्याही व्यक्तीला फक्त एकदाच दिले जाते. अशा परिस्थितीत, जर ते बंद केले तर त्या व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. 

पॅन कार्ड आधारशी कसे लिंक करावे?

तुमचे पॅन कार्ड ऑनलाइन आधारशी लिंक करण्यासाठी पुढे दिलेल्या वेबसाइटला भेट द्या. (PAN card will get inactive from April 1 if not linked to Aadhaar know details) 
https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/

हेही वाचा : 'आमचं कोकणही...', समृद्धी महामार्गावरून अभिनेता Abhijeet Kelkar चा राज्यकर्त्यांना टोला

त्यानंतर फॉर्ममध्ये तुमचा पॅन आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डनुसार तुमचे नाव लिहावे लागेल. मग, जर तुमच्या आधार कार्डवर फक्त तुमची जन्मतारीख लिहिलेली असेल, तर तुम्हाला बॉक्समध्ये उजवीकडे एक चिन्ह लावावे लागेल. त्यानंतर पडताळणी करण्यासाठी, इमेजमध्ये दिलेला कॅप्चा कोड त्यात टाकावा लागेल. मग तुमच्या समोर 'Link Aadhaar' चा पर्याय येईल. त्यावर क्लिक करा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले जाईल.