Sankashti chaturthi december 2022 : कलाधिपती आणि ईष्ठ देवता म्हणून गणल्या जाणाऱ्या गणपती गजाननाची पूजा करत बाप्पासाठी खास नैवेद्याचा बेत आखला जातो तो म्हणजे संकष्टी चतुर्थीला (Sankashti Chaturthi 2022). गणपतीला (Ganpati Bappa) समर्पित असणारा हा उपवास महिला, आपल्या लेकरांच्या सुखासाठी करतात असं म्हटलं जातं. या महिन्यातील संकष्टी 11 डिसेंबर 2022 म्हणजेच आज, रविवारच्या दिवशी आली आहे. त्यामुळं या वेळची रविवारची सुट्टी अनेकांच्याच घरी गोडाधोडाचा बेत असेल.
आता संकष्ट चतुर्थी म्हटलं कि प्रसादासाठी बाप्पाचे आवडीचे मोदक बनवणं हे तर आलच पण, मोदकांचे बरेच प्रकार असतात पण सामान्यतः उकडीचे मोदक बनवले जातात पण बऱ्याचदा उकडीचे मोदक सर्वानाच जमतात असं नाही, कधी उकड चुकते कधी साचा बनत नाही तर कधी मोदक फुटू लागतो आणि या सगळ्या प्रोसेसला खूप वेळ जातो हे ही तितकंच खरं. (How to make modak)
बरं मोदक हि खायचे आहेत आणि वेळसुद्धा वाचवायचा आहे तर चला आज आपल्या खास सेगमेंट मध्ये घेऊन आलोय १० मिनिट होतील असे पनीरचे मोदक आणि हो हे मोदक खाईलासुद्धा तितकेच चविष्ठ आणि कमाल लागतात.. (how to make ukdiche modak easy)
साहित्य
* दीड वाटी मावा
* पनीर अर्धा वाटी
* दोन वाट्या पिठी साखर
* इलायची
* पाऊण वाटी खवलेलं खोबर
* केसर
कृती
मंद आचेवर कोरडा होईपर्यंत मावा परतून घ्या , पनीर हाताने कुस्करून घ्या आणि केसर घालून २-३ मिनिट परतून घ्या, पनीर थंड झाल्यावर त्यात साखर घाला एकजीव करून घ्या
आणि त्याचे छोटे गोळे तयार करा , आता माव्यामध्ये इलायची पावडर घाला आणि साखर घालून एकजीव करून घ्या, पनीरप्रमाणे मावयाचेसुद्धा गोळे बनवा हे आकाराने थोडे मोठे असावेत
आता या माव्याच्या गोळ्याची पाळी बनवून घ्या आणि पनीरचे मिश्रण त्यात भर आणि मोदकाप्रमाणे आकार द्या. यासाठी तुम्ही मोदक बनवण्याचा साचा सुद्धा वापरू शकता...झटपट आणि स्वादिष्ट मोदक तयार!
चला तर मग आज संकष्टीला पनीरचे मोदक बनवा आणि घरच्यांना खाऊ घाला आणि सर्वांची वाहव्वा मिळवा... (modak out of paneer sankashti chaturthi december 2022 know the easy recipe jmp )