पाकिस्तानची सैन्य ताकद वाढली, भारत चौथ्या स्थानी

हेलिकॉप्टर्सचाही समावेश आहे. तर चीनकडे ३ हजार लढाऊ विमानं आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 11, 2018, 06:43 PM IST
पाकिस्तानची सैन्य ताकद वाढली, भारत चौथ्या स्थानी title=

नवी दिल्ली : ग्लोबल फायर पावरने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेकडे सर्वात जास्त १३ हजार लढाऊ विमानं आहेत, यात हेलिकॉप्टर्सचाही समावेश आहे. तर चीनकडे ३ हजार लढाऊ विमानं आहेत.

भारताकडे लढाऊ विमानांची संख्या २ हजार 

भारताकडे लढाऊ विमानांची संख्या २ हजार आहे, तर सक्रीय सैनिकांची संख्या १३ लाख आहे, याशिवाय २८ लाख राखीव जवान आहेत. वेळ आल्यास हे जवान सैन्याची मदत करू शकतात.

भारताकडे रणगाड्यांची संख्या ४ हजार ४००

भारताकडे रणगाड्यांची संख्या ४ हजार ४०० इतकी आहे, युद्धनौकांची संख्या ३ असल्याचं सांगण्यात येतंय, यातील एक युद्धनौका समुद्रातून हटवण्यात आली आहे.

मात्र या यादीत पाकिस्तानचा नंबर जगात तेरावा

मात्र या यादीत पाकिस्तानचा नंबर जगात तेरावा आहे. या आधी पाकिस्तान पंधराव्या स्थानी होता. पाकिस्तानचा संरक्षण बजेट ७ अरब डॉलर आहे. तर सक्रीय सैनिकांची संख्या ६ लाख ३७ हजार आहे. याशिवाय ३ लाख सैनिकांचं राखीव दल आहे.

जहाजांसह लढाऊ विमानांची संख्या १ हजार

पाकिस्तानकडे हेलिकॉप्टर आणि ट्रान्सपोर्ट जहाजांसह लढाऊ विमानांची संख्या १ हजार आणि रणगाड्यांची संख्या ३ हजाराच्या जवळपास आहे. पाकिस्तानकडे युद्धनौका नाहीय.मात्र इतर प्रकारच्या नौकांची संख्या २०० आहे.

इस्त्राईल नवव्या स्थानावर

या यादीत ८१ लाख लोकसंख्येचा देश इस्त्राईल नवव्या स्थानावर आहे, इस्त्राईलकडे ६५० लढाऊ विमानं आहेत, तर दीड हजार टँक आहेत.