श्रीनगर : पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. यावेळेस जम्मू-काश्मीरच्या मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. सामान्य नागरिकांना टार्गेट करुन गोळीबार करत आहे.
याआधी बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या सैनिकांनी सीमेवर पुंछ सेक्टरमध्ये गोळीबार केला होता.
पाकिस्तानच्या रेंजर्सने भारतीय चौक्यांवर फायरिंग सुरु केली. फायरिंगनंतर भारतीय जवानांनी देखील त्याला जोरदार प्रत्यूत्तर दिलं.