पाकनं केल शस्त्रसंधीच उल्लंघन, ४ भारतीय जवान शहीद

  पाकिस्ताननं केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात लष्कराचे ४ जवान शहीद झालेत. नियंत्रण रेषेवर राजौरी इथं पाकिस्तानी रेंजर्सनी भारतीय तळांच्या दिशेनं गोळीबार केला.

Updated: Feb 4, 2018, 11:08 PM IST
 पाकनं केल शस्त्रसंधीच उल्लंघन, ४ भारतीय जवान शहीद  title=

राजौरी :  पाकिस्ताननं केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात लष्कराचे ४ जवान शहीद झालेत. नियंत्रण रेषेवर राजौरी इथं पाकिस्तानी रेंजर्सनी भारतीय तळांच्या दिशेनं गोळीबार केला.

४ शहीद, १ जखमी 

या भ्याड हल्ल्यात ४ जवान शहीद झालेत. तर एक जवान जखमी झालाय.

नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणी पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करतंय.