मुंबई : CDS जनरल बिपिन रावत यांच्या निधनावर सगळीकडून शोक व्यक्त होत आहे. एवढंच नव्हे तर CDS बिपिन रावत यांच्या निधनावर पाकिस्तानकडूनही शोक व्यक्त करण्यात आला. CDS चे हेलीकॉप्टर तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ क्रॅश झाले. यामध्ये जनरल रावत त्यांच्या पत्नीसह 14 लोकं उपस्थित होते. यामधील 13 जणांचे निधन झाले आहे. जनरल बिपिन रावत यांच्या निधनाचा धक्का संपूर्ण देशाला बसला आहे.
सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या निधनाबद्दल पाकिस्ताननेही शोक व्यक्त केला आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी (CJCSC) लेफ्टनंट जनरल नदीम राजा आणि लष्कर प्रमुख (COAS) जनरल कमर जावेद बाजवा यांनी CDS जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका आणि अपघाताता मृत्यमुखी पडलेल्या सगळ्यांना आदरांजली वाहिली आहे. मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. पाकिस्तानी सशस्त्र दलाच्या प्रवक्त्याने ट्विट करून ही माहिती दिली आहे.
General Nadeem Raza, CJCSC & General Qamar Javed Bajwa, COAS express condolences on tragic death of #CDS General #BipinRawat, his wife and loss of precious lives in a helicopter crash in India
— DG ISPR (@OfficialDGISPR) December 8, 2021
यूएस दूतावासाने सीडीएस रावत आणि अपघातात प्राण गमावलेल्या इतरांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, देशातील पहिले सीडीएस म्हणून भारतीय सैन्यात परिवर्तनाच्या ऐतिहासिक काळाचे नेतृत्व केले. त्यांनी अमेरिकेच्या सैन्यासह भारताच्या संरक्षण सहकार्याच्या मोठ्या विस्ताराची देखरेख केली.
रशियाचे राजदूत निकोलय कुडाशेव यांनीही जनरल रावत यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. भारताने आपला महान देशभक्त आणि समर्पित नायक गमावला आहे. दुसर्या ट्विटमध्ये कुदाशेव म्हणाले की, रशियाने एक अतिशय जवळचा मित्र गमावला आहे, ज्याने आमच्या द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारीला चालना देण्यात मोठी भूमिका बजावली आहे.
त्याचप्रमाणे, इस्रायलचे संरक्षण मंत्री बेनी गँट्झ यांनी रावत यांचे इस्त्रायली संरक्षण दल (आयडीएफ) आणि इस्रायलच्या संरक्षण आस्थापनांचे खरे सहयोगी असल्याचे वर्णन केले. त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, सीडीएस रावत यांनी दोन्ही देशांमधील सुरक्षा संबंध मजबूत करण्यात मोठे योगदान दिले आहे