Ritesh Agarwal Marriage : OYO हॉटेल्सचा मालक आहे करोडपती, Networth एकूण धक्का बसेल

Ritesh Agarwal Networth :OYO चा संपुर्ण नाव  Own Your Own आहे. हे बजेट एग्रीगेटर म्हणून सुरू झाले, ज्याला सॉफ्टबँक द्वारे निधी दिला जातो. लक्झरी रिसॉर्ट्स आणि व्हेकेशन होम्ससह वैयक्तिक मालमत्ता समाविष्ट करण्यासाठी आता त्याचा विस्तार झाला आहे. 

Updated: Jan 26, 2023, 04:36 PM IST
Ritesh Agarwal Marriage : OYO हॉटेल्सचा मालक आहे करोडपती, Networth एकूण धक्का बसेल  title=

Ritesh Agarwal Networth : ओयो हॉटेलचा संस्थापक आणि CEO रितेश अग्रवाल (Ritesh Agarwal) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे या युवा उद्योजकाच्या लग्नाची उद्योग विश्वात चर्चा रंगली आहे. भारतातील सर्वात यशस्वी तरुण उद्योजकांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. तसेच त्याच्या बिझनेस मॉडेलसाठी त्यांना अनेक वेळा पुरस्कार देखील मिळाले आहेत. दरम्यान रितेश अग्रवाल कोण आहेत? ओयो हॉटेल रूमची त्यांनी सुरूवात कशी केली? तसेच त्याचे नेटवर्थ किती आहे? हे जाणून घेऊयात. 

अशी सुरूवात झाली ओयो हॉटेल्सची

रितेश अग्रवाल (Ritesh Agarwal) याचा जन्म ओडिशातील मारवाडी कुटुंबात झाला. 2011 मध्ये कॉलेजच्या अभ्यासासाठी तो दिल्लीत आला होता. 2 वर्षांनंतर त्याचा नंबर थिएल फेलोशिप प्रोग्राममध्ये आला.यानंतर त्याने कॉलेज सोडण्याचा निर्णय़ घेतला.  खरं तर, तरुण उद्योजकांना व्यवसाय उभारणीसाठी मदत व्हावी म्हणून Thiel फेलोशिप दिली जाते. रितेश या फेलोशिपचा विजेता ठरला होता. म्हणून त्याला 1 लाख डॉलर्स म्हणजेच 81 लाख रुपये अनुदान मिळाले होते. या पैशातून त्याने ओयो हॉटेल्सची सुरूवात केली होती.

800 शहरांमध्ये कंपनीचा विस्तार

OYO चा संपुर्ण नाव  Own Your Own आहे. हे बजेट एग्रीगेटर म्हणून सुरू झाले, ज्याला सॉफ्टबँक द्वारे निधी दिला जातो. लक्झरी रिसॉर्ट्स आणि व्हेकेशन होम्ससह वैयक्तिक मालमत्ता समाविष्ट करण्यासाठी आता त्याचा विस्तार झाला आहे. OYO ही आज भारतातील सर्वात यशस्वी हॉस्पिटॅलिटी कंपन्यांमध्ये गणली जाते. अनेक देशांमध्ये त्याचा विस्तारही होत आहे. 

दरम्यान रितेश अग्रवालने (Ritesh Agarwal) 2013 मध्ये याची सुरुवात केली होती, त्यावेळेस त्याचे वय अवघे 19 वर्ष होते. आता भारतातील सर्वात मोठ्या स्टार्टअप्समध्ये त्याच्या कंपनीचे नाव घेतले जाते. Oyo चा व्यवसाय 800 हून अधिक शहरांमध्ये पसरलेला आहे. हा व्यवसाय पुढे वाढत चालला आहे. 

संपत्ती किती?

मीडिया रिपोर्टनुसार रितेश अग्रवाल (Ritesh Agarwal) आता 29 वर्षांचा आहे.  आणि त्याची एकूण संपत्ती सुमारे युएस डॉलर 1.1 बिलियन (रु. 7253 कोटी) असल्याचे सांगितले जाते.भारतातील सर्वात यशस्वी तरुण उद्योजकांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या बिझनेस मॉडेलसाठी त्यांना अनेक वेळा पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय फोर्ब्स आणि इतर अनेक संस्थांनी त्यांची यशोगाथा जगाला सांगितली आहे.

दरम्यान सध्या रितेश अग्रवाल (Ritesh Agarwal) त्याच्या लग्नामुळे चर्चेत आले आहेत. कारण लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. तसेच लग्नानंतर दिल्लीतील एका मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये रिसेप्शन होणार असल्याची माहिती आहे.