Optical Illusion: या फोटोतील एक जोडपं आहे एकदम वेगळं, कसं ते शोधून दाखवा

तुम्हाला या फोटोतील ऑड वन आउट जोडपं शोधायचं आहे. जर तुम्ही कोडं सोडवण्यात यशस्वी ठरलात, तर तुमची बुद्धी खरंच तल्लख आहे, असं म्हणावं लागेल. 

Updated: Aug 23, 2022, 06:03 PM IST
Optical Illusion: या फोटोतील एक जोडपं आहे एकदम वेगळं, कसं ते शोधून दाखवा title=

Spot The Odd One Out Couple: ऑप्टिकल इल्यूजन फोटोतील दडलेली रहस्य शोधताना बुद्धीचा कस लागतो. काही जणं या फोटोतील कोडं पटकन सोडवतात. तर काही जणांना या फोटोतील कोडं सोडवणं कठीण होतं. त्यामुळे एकदा का ऑप्टिकल इल्यूजन फोटो समोर आला की लगेचच ते कोडं सोडवण्यासाठी एक पाऊल पुढे पडतं. असाच एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या फोटो अनेक जोडपी दिसत आहेत. त्यापैकी एक जोडपं वेगळ आहे. अगदी बरोबर..तुम्हाला या फोटोतील ऑड वन आउट जोडपं शोधायचं आहे. जर तुम्ही कोडं सोडवण्यात यशस्वी ठरलात, तर तुमची बुद्धी खरंच तल्लख आहे, असं म्हणावं लागेल. 

अचूक उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला हा फोटो बारकाईन पाहावा लागेल. पिवळं बॅकग्राउंडवर काळ्या रंगात 36 जोडपी दिसत आहेत. यातील एक जोडपं वेगळं आहे. तर 35 जोडपी एकसारखी आहेत. त्यामुळे या फोटोकडे एकटक पाहून वेगळे जोडपं शोधा. जर तुम्हाला वेगळं शोधण्यात अपयश आलं तर चिंता करू नका. आम्ही तुम्हाला या फोटोतील वेगळं जोडपं शोधण्यात मदत करू. पण तत्पूर्वी तुम्ही एक प्रयत्न करून पाहा. शोधण्यात अपयश आलं तर खाली दिलेला फोटो पाहा...

36 जोडप्यांपैकी हे जोडपं वेगळं कसं आहे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जोडपं वेगळं आहे कारण की, सदर व्यक्ती आपल्या पार्टरनच्या कपाळावर किस करत आहे. आता ऑप्टिकल इल्यूजनमधील कोडं सुटल्यानंतर इतरांना चॅलेंज द्या. बघा त्यांना हे कोड सोडवण्यात यश मिळतंय का नाही ते..