Video: 'पुष्पा'च्या गाण्यावर मुलीचा जबरदस्त डान्स, रस्त्यावर जमली बघ्यांची गर्दी

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. 

Updated: Jun 22, 2022, 06:58 PM IST
Video: 'पुष्पा'च्या गाण्यावर मुलीचा जबरदस्त डान्स, रस्त्यावर जमली बघ्यांची गर्दी title=

Dance Viral Video: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. यात डान्सच्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. भारतीय लोकांमध्ये डान्सची प्रचंड क्रेझ आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या मुलीच्या डान्स पाहून नेटकरी खूश झाले आहेत. या मुलीने पिवळ्या रंगाचा लेहेंगा घातला असून तिचे केसही खुले आहेत. तिने डान्स करत यूजर्सचे सर्वाधिक मनोरंजन केले. 

या मुलीची एनर्जी लेव्हल पाहून लोकही स्वतःला नाचण्यापासून रोखू शकले नाहीत. जागेवर उभे राहून तिच्या डान्सला प्रतिसाद देताना दिसत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत दोन लाख लोकांनी पाहिला आहे. एवढेच नाही तर या व्हिडिओला 90 हजारांहून अधिक लोकांनी लाईकही केले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vasu (@devasuu0)

या मुलीच्या डान्सचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. एका युजरने तर लिहिलं आहे की, ती मुलीपुढे समांथाही नापास झाली. काही यूजर्स तिच्या सौंदर्यावर आणि काही डान्स स्टेप्सवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले.