ओमायक्रॉनचा विळखा घट्ट होतोय, देशात रुग्णसंख्या 170 वर

Omicron Scare: देशाची चिंता वाढवणारी बातमी. पुढील महिना सर्वाधिक धोकादायक असणार आहे.  

Updated: Dec 21, 2021, 10:06 AM IST
ओमायक्रॉनचा विळखा घट्ट होतोय, देशात रुग्णसंख्या 170 वर title=

मुंबई : Omicron Scare: देशाची चिंता वाढवणारी बातमी. पुढील महिना सर्वाधिक धोकादायक असणार आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटवर वैज्ञानिकांनी हा इशारा दिला आहे. भारतात आतापर्यंत 170 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.   

महाराष्ट्र राज्यात 54 ओमायक्रॉनबाधित रुग्ण असून 31 ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. कर्नाटक, गुजरात, केरळ, दिल्लीमध्ये नवे रुग्ण आढळले आहे. देशासह परदेशातही ओमायक्रॉनचा वेगाने प्रसार होत आहे.

देशात ओमायक्रॉनचा विळखा घट्ट होत आहे. देशभरात रुग्णसंख्या 170 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 31 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. सोमवारी महाराष्ट्रात एकही ओमायक्रॉनबाधित आढळलेला नाही. मात्र, कर्नाटक, गुजरात, केरळ, दिल्लीमध्ये नवे रुग्ण सापडले आहेत. देशासह परदेशातही ओमायक्रॉनचा वेगाने प्रसार होत असल्याने चिंता वाढली.