OMG! जबड्यात धरून वाघानं ओढली चक्क गाडी, पाहा व्हिडीओ

याला म्हणताता वाघाच्या जबड्याची पावर! कधी पाहिली नसेल तर हा व्हिडीओ एकदा पाहाच  

Updated: Jan 1, 2022, 02:24 PM IST
OMG! जबड्यात धरून वाघानं ओढली चक्क गाडी, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : पर्यटकांसमोर वाघानं कुत्र्याची शिकार केल्याचा व्हिडीओ नुकताच ताजा असताना आता आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा यासाठी आहे की या वाघाची ताकद या व्हिडीओमधून दिसत आहे. 

भल्यामोठ्या प्राण्याची शिकार करणारा वाघ चक्क गाडी ओढताना दिसला आहे. वाघ आपल्या जबड्यात गाडीचा मागचा भाग पकडून तो जोरात ओढताना दिसला. धक्कादायक बाबा म्हणजे वाघाने जबड्यात गाडीचा मागचा भाग पकडून गाडी मागे ओढली. गाडी जागची हलली देखील. 

हा व्हिडीओ एक क्षण पाहिल्यावर डोळ्यांवर विश्वास बसत नाही पण याच व्हिडीओमधून वाघाच्या जबड्याची ताकद काय असू शकते याचा अंदाज येईल. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

505.6 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून 26 हजारहून अधिक लोकांनी त्याला लाईक केलं. अडीच हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे. आनंद महिंद्रा यांनी दिलेल्या कॅप्शनवर अनेक युझर्सनी मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत. वाघाच्या जबड्याची आणि दातांची पावर दाखवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.