नवी दिल्ली : आतापर्यंत कुत्र्याने चिमुकल्यांवर हल्ले केल्याचं ऐकलं असेल. पण चिमुकलीसाठी जीवाचं रान करणाऱ्या या कुत्र्याची कहाणी डोळे पाणावणारी आहे. या कुत्र्यानं जे केलं ते पाहून खूप भावुक व्हायला होतं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.
कुत्रे हे प्रामाणिक आणि सच्चे मित्र असतात असं जे म्हणतात ते खोटं नाही. याआधी आपल्या मालकासाठी रात्रंदिवस रुग्णालयात बसलेल्या कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता चक्क आपल्या जीवाभावाच्या माणसासाठी तो 5 किलोमीटर रिक्षामागे धावून गेला आहे.
नेमकं काय घडलं?
हा कुत्रा रिक्षाचा पाठलाग करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. एक कुटुंब राहत्या ठिकाणहून दुसरीकडे शिफ्ट झालं. त्यामुळे त्यांना आधीचं घर सोडावं लागलं. या कुटुंबामध्ये एक एक लहान मूल होतं. त्याच्यासोबत या कुत्र्याची मैत्री झाली. दोघंही खूप आनंदात असायचे. मात्र अचानक या कुटुंबावर घर बदलण्याची वेळ आली.
हा कुत्रा आपल्या मैत्रीणीपासून दूर राहू शकला नाही. त्याला जेव्हा समजलं तेव्हा तो धावत या रिक्षामागे गेला. थोडं नाही तर 5 किलोमीटरपर्यंत तो रिक्षामागे धावत होता. हे कुटुंब या कुत्र्याला खायला घालत असावं अशीही एक चर्चा आहे.
ही भावुक करणारी घटना आग्रा परिसरातील असल्याची माहिती मिळाली आहे. प्रामाणिकपणा आणि खरं प्रेम या कुत्र्याकडून शिकावं असंही काही युजर्सनी या व्हिडीओवर म्हटलं आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत.
ये रिश्ता अटूट है. आगरा के जगदीश पुरा क्षेत्र से जब किरायेदार दूसरी जगह शिफ्ट होने जाने लगे तो किरायेदार के बच्चों का सबसे प्यारा दोस्त स्ट्रीट डॉग 5 किमी तक दौड़ता रहा. प्यार की जीत हुई. अब बच्चों के साथ स्ट्रीट डॉग का भी पता बदल गया. @narendramodi @DrKumarVishwas pic.twitter.com/Clg3lP3DWp
— Himanshu Tripathi (@thimanshut) June 28, 2022