दादी अम्मा..दादी अम्मा...! आजीचा Dance पाहून तुम्हीही असंच म्हणाल, Video सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावरील एखादा व्हिडीओ भावला की तो वेगाने व्हायरल होतो. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. इतकंच काय तर या व्हिडीओची चर्चा देखील रंगते. त्यामुळे कधी काय व्हायरल (Viral) होईल सांगता येत नाही. 

Updated: Nov 9, 2022, 06:33 PM IST
दादी अम्मा..दादी अम्मा...! आजीचा Dance पाहून तुम्हीही असंच म्हणाल, Video सोशल मीडियावर व्हायरल title=

Dadi Dance Viral On Social Media: सोशल मीडियावरील एखादा व्हिडीओ भावला की तो वेगाने व्हायरल होतो. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. इतकंच काय तर या व्हिडीओची चर्चा देखील रंगते. त्यामुळे कधी काय व्हायरल (Viral) होईल सांगता येत नाही. लग्नात डान्स करायला सगळ्यांनाच आवडतं. रोजच्या दिवसातला ताण बाजूला ठेवून बँड किंवा डीजेच्या तालावर ठेका घेतला जातो. भारतातील लग्न सोहळे तर डान्सशिवाय अपूर्णच आहेत, असंच म्हणावं लागेल. लग्नसमारंभातील नाचगाण्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही आजवर पाहीले असतील. असाच एका आजींच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आजीला नाचताना पाहून तुम्हालाही नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक आजी स्टेजवर ठेका धरताना दिसत आहे. इतकंच काय तर उपस्थितांच्या नजरा देखील तिच्यावर खिळल्या आहेत. 'ढोल जगिरो दा' या पंजाबी गाण्याच्या तालावर त्या नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. आता हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहेत. आतापर्यंत हा व्हिडीओ 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलं आहे की, वय वर्षे फक्त आकडा आहे, मॅम तुम्ही खरंच जबरदस्त आहात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आजीचा डान्स पाहून एका युजर्सने लिहिलं आहे की, "खरं तर आजीने संपूर्ण लग्न आपल्या नावावर केलं असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्येकाच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत." दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, "हे गाणं असं आहे की, कोणीही स्वत:ला रोखू शकत नाही."