अनैतिक संबंध उघड झाल्यावर लोकांनी दिली 'ही' शिक्षा!

ओडिशामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 17, 2017, 08:05 PM IST
अनैतिक संबंध उघड झाल्यावर लोकांनी दिली 'ही' शिक्षा! title=

नवी दिल्ली : ओडिशामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ओडिशा येथील मलकानगिरी भागातील कुर्सीवाड़ा येथे राहणाऱ्या एका महिला आणि युवकाला विजेच्या खांबाला बांधून जबरदस्त मारहाण करण्यात आली. त्या घटनेचा व्हिडीओ देखील शूट करण्यात आला. त्या महिला आणि युवकांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. 

मात्र त्यांच्या गुन्ह्याबद्दल पोलिसांत तक्रार न करता कायदा हातात घेऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला विवाहीत असून या महिलेचे त्या युवकाशी अनैतिक संबंध होते. त्या दोघांना एकत्र जंगलात जाताना कोणीतरी पाहिल्याने नंतर लोकांना जमवून त्यांना ही शिक्षा देण्यात आली. दरम्यान पोलिसांना घटनेची खबर लागतच ते तातडीने घटनास्थळी पोहचले आणि लोकांना शांत केले. 

त्यांना केलेल्या बेदम मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.