नवी दिल्ली : दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली.
स्थानिक ज्वेलर्सकडून मागणी घटल्याने सोन्याच्या दरात ७५ रुपयांची घसरण होत ते प्रति ग्रॅम ३०,४५० रुपयांवर बंद झाले. सोन्यासह चांदीच्या दरातही १०० रुपयांची घसरण होत ते प्रति किलो ४०,५५० रुपयांवर बंद झाले.
व्यापाऱ्यांच्या मते स्थानिक ज्वेलर्स आणि रिटेलर्स कडून मागणी घटल्याने सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळतेय.
जागतिक स्तरावर सिंगापूरमध्ये सोन्याच्या किंमतीत ०.२७ टक्क्यांची वाढ होत ते १२८१.७० डॉलर प्रति औंसवर पोहोचले तर चांदीच्या दरात १ृ०.३ टक्क्यांची वाढ होत ते १७.०६ प्रति औंसवर पोहोचले.
राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर अनुक्रमे ३०,४५० आणि ३०,३०० रुपये प्रति ग्रॅम होते. गेल्या सत्रात सोन्याच्या दरात १०० रुपयांची घसरण झाली होती.