मुंबई : आजच्या जगात टेक्नोलॉजी इतकी पुढे गेली आहे की काधी कोणता शोध लागेल हे सांगता येणं देखील शक्य नाही. टेक्नॉलॉजिच्या जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याची आपल्याला माहिती देखील नसते. यासाठीच आम्ही तुमच्यासाठी अशी माहिती समोर घेऊन आलो आहोत, जे जाणून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. आजकाल चोरांपासून बचावासाठी सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात. मग ते कोणतंही दुकान असो, रेल्वे स्थानक असो किंवा घर. सर्वच ठिकाणी सध्या सीसीटीव्ही वापरला जातो.
परंतु सर्वांनाच आपल्याकडे सीसीटीव्ही बसवणं बजेटमुळे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत इच्छा असूनही पैशांमुळे सीसीटीव्ही कॅमेरे लोक बसवू शकत नाहीत.
परंतु आज आम्ही अशा काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. याच्या मदतीने तुम्ही तुमचा मोबाईलचा वापर तुमचा सीसीटीव्ही कॅमेरा म्हणून वापरु शकता. यामुळे तुम्ही कितीही लांब असलात, कुठेही असलात, तरी देखील तुम्ही संपूर्ण घरावरती नजर ठेऊ शकता.
जर तुमचे बजेट कॅमेरा बसवण्याचे नसेल, तर घरातील जुन्या फोनचा कॅमेरा चालू करा आणि तो अशा ठिकाणी ठेवा की, जेथून तुम्हाला सगळं काही पाहाता येईल. परंतु तुम्ही हे देखील लक्षात ठेवा की यासाठी तुमचा फोन वाय-फायशी कनेक्ट असणं आवश्यक आहे.
यानंतर तुम्हाला काही अॅप्स डाउनलोड करावे लागतील. ज्याच्या मदतीने तुम्ही सीसीटीव्ही सुरू करु शकता.
हे ऍप घराच्या सुरक्षिततेसोबतच तुमची सुरक्षितताही राखते. या ऍपमध्ये तुम्ही तुमचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह रिअल-टाइम लोकेशन शेअर करू शकता. याशिवाय तुमच्या
घरी ठेवलेल्या मोबाईलला कनेक्ट केल्यानंतर तुम्ही घरात काय चालले आहे तेही पाहू शकता.
या ऍपला तुम्ही अष्टपैलू म्हणू शकता. यामुळे तुम्हाला केवळ तुमच्या घरात काय चालंय हेच पाहाता येणार नाही, नाही तर आणखी अनेक आश्चर्यकारक वैशिष्ट्ये देखील यामुळे तुम्हाला मिळते.
समजा याद्वारे घर लाइव्ह पाहताना तुम्हाला काहीतरी गडबड दिसली आणि तुम्ही शहराबाहेर असाल, तर त्यात उपस्थित आपत्कालीन मदत पर्यायाचा वापर करून, तुम्ही एका बटणाच्या क्लिकवर पोलिस किंवा इतर आपत्कालीन सेवेला संदेश देखील देऊ शकता.
तुम्हाला फोन सीसीटीव्ही कॅमेरा म्हणून वापरायचा असेल, तर तुमच्यासाठी ProtonVPN हा सर्वोत्तम पर्याय असेल. या अॅपमध्ये सुरक्षा आणि गोपनीयतेची विशेष काळजी घेतली
जाते. तो त्याच्या सर्व्हरवर काहीही रेकॉर्ड करत नाही. हे जगभरातील अनेक सर्व्हरशी कनेक्ट केलेले आहे, ज्यामुळे तुम्हाला ते वापरणे सोपे होते.
तुमचा जुना स्मार्टफोन एखाद्या ठिकाणी बसवल्यानंतर तुम्ही Manything अॅप डाउनलोड करा. हे अॅप मोफत आहे. तुम्ही ते फोनशी कनेक्ट केल्यावर, जेव्हाही तुम्हाला घरात काही विचित्र दिसेल तेव्हा ते तुम्हाला अलर्ट पाठवेल. याद्वारे तुम्ही तुमच्या घरात काय चालंय हे पाहू शकता.