Beer price hike: देशातील पेट्रोल-डिझेल आणि खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींचा फटका सर्वच क्षेत्राला बसत आहे. याचा फटका बिअर कंपन्यांनाही बसल आहे. लवकरच बिअरच्या किमती वाढणार आहेत. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने आता बिअरच्या किमतीही वाढवल्या जाऊ शकतात, असे कंपन्यांचे म्हणणं आहे.
यासोबतच उन्हाळी हंगामात बिअरची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत कंपन्या किंमत वाढवण्याचा विचार करत आहेत.
कच्च्या मालाच्या किमतीत वाढ
बिअर बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या सामानाची किंमत तीन महिन्यांत दुप्पट झाली आहे. यासोबतच बॉटलिंग कंपन्यांनीही दरात 30 टक्क्यांनी वाढ केली आहे. इतकंच नाही तर लेबलपासून ते बॉक्सपर्यंतच्या किमतीही वाढल्या आहेत. अशा स्थितीत बिअरच्या किमती वाढवण्यासाठी कंपन्यांवर दबाव आहे.
United Breweries चे सीईओ ऋषी परदल यांच्या म्हणण्यानुसार दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्रासह अनेक शहरांमध्ये बिअरच्या किमती वाढवणार आहे. ग्राहकांवर जास्त बोजा पडू नये म्हणून दरात योग्य पद्धतीने वाढ केली जाईल, असे ते म्हणाले. यूबी कंपनी हेनेकेन आणि किंगफिशर ब्रँड अंतर्गत बिअर बनवते. यापूर्वी कंपनीने बीरा 91 ब्रँडच्या किमती वाढवल्या आहेत.
प्रसिद्ध ब्रांड्सच्या किंमतीत वाढ
डिवांन् मॉडर्न ब्रुअरीजचे एमडी प्रेम दिवाण म्हणाले की, वाढत्या खर्चामुळे कंपनीवरील बोजा वाढला आहे आणि अशा परिस्थितीत आमच्यासमोर दोन पर्याय आहेत. कंपनीने एकतर बिअरच्या किमती वाढवाव्यात किंवा त्यावरील सवलत रद्द करावी.
देशातील दारूच्या किमतींवर राज्य सरकारचे नियंत्रण आहे. यासोबतच राज्यांना त्याच्या विक्रीतून मोठा महसूल मिळतो.