तुमच्या डिग्रीला रद्दीचा भाव? उच्चशिक्षित असूनही बेरोजगारीचा शाप?

ब्लूमबर्गने सादर केलेल्या या अहवालातून भारतातल्या बेरोजगारीच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केलाय. हा अहवाल काय सांगतो पाहुयात.

Updated: Apr 19, 2023, 08:36 PM IST
तुमच्या डिग्रीला रद्दीचा भाव? उच्चशिक्षित असूनही बेरोजगारीचा शाप? title=

एका बाजूला गुगल आणि अॅपलसारख्या कंपनीत भारतीय तरुणांची भरती होतेय, तर दुसरीकडे देशातली बेरोजगारी वाढताना दिसतेय. उच्चशिक्षित तरुण आहेत, कंपनीत नोकऱ्याही आहेत मात्र तरीही बेरोजगारीचा स्फोट होतोय. ही परिस्थिती का ओढवतेय त्यावर ब्लूमबर्गनं एक अहवाल सादर केलाय. 

ब्लूमबर्गने सादर केलेल्या या अहवालातून भारतातल्या बेरोजगारीच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केलाय. हा अहवाल काय सांगतो पाहुयात.

डिग्री आहे, नोकरी का नाही? 

  • महत्त्वाच्या डिग्री आणि उच्चशिक्षित असूनही तरुण बेरोजगार आहेत याचं सर्वात मोठं कारण शिक्षणपद्धती 
  • भारतीय तरुणांच्या डिग्रीबद्दल अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे
  • तरुणांकडे कागदोपत्री डिग्री तर आहेत मात्र, संस्था, कंपन्यांसाठी आवश्यक असलेले कौशल्य उच्चशिक्षितांकडे नाही 
  • आता याचं मुख्य कारण ठरतंय भारताची शिक्षणव्यवस्था
  • शिक्षण व्यवस्थेतील अभ्यासक्रम हे कंपन्यांच्या गरजा पूर्ण करु शकत नाहीत
  • त्यामुळे तरुणांकडे अभ्यासक्रम पूर्ण केल्याच्या डिग्री आहेत मात्र नोकरीसाठी आवश्यक कौशल्य नाहीत
  • साहजिकच कंपन्यांमध्ये जॉब आहेत मात्र ते करु शकतील अशी कौशल्य असणारे माणसं नाहीत

सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या फौजाच्या फौजा तयार होतायत. स्कील इंडिया 2022 च्या रिपोर्टनुसार..

  • देशात 48.7 % तरुण बेरोजगार आहेत 
  • याचा अर्थ 2 तरुणांमागे एक बेरोजगार आहे

डिग्री आहे, नोकरी नाही - हेडर

  • बी.कॉम 40%
  • बी.एससी 63%
  • आयटीआय 66 %
  • पॉलिटेक्निक 72%
  • बी.फार्म 43%

एकंदरीत विरोधाभासच म्हणावा लागेल की, एकीकडे सुंदर पिचाई, सत्या नडेलांसारखे ग्लोबल लिडर्स भारतानं तयार केलेत. दुसरीकडे देशात कोट्यवधी तरुण डिग्री असूनही बेरोजगार आहेत. भारतीय शिक्षण व्यवस्थेत या दुष्टचक्राचं मूळ असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आलाय. एक समाज म्हणून सरकारनं याचा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. नाहीतर भविष्यात आणखी तीव्रतेनं बेरोजगारीचा स्फोट होऊ शकतो..