रेल्वेमंत्री गोयल यांना प्रवाशाने सुनावलं, 'तुमच्यापेक्षा प्रभू चांगले होते'

माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू रेल्वे अपघात टाळण्यात अयशस्वी ठरले असले तरी ते आणि त्यांचं मंत्रालय सोशल मीडियावर अतिशय सक्रिय होतं. लोक फक्त माजी रेल्वेमंत्री प्रभु यांना रेल्वे समस्या ट्विट करायचे आणि लोकांना लगेच ते प्रतिक्रिया द्यायचे. पण प्रभू यांच्या राजीनाम्यानंतर रेल्वे मंत्रालय देखील आळशी झालं. 

Updated: Oct 24, 2017, 03:59 PM IST
रेल्वेमंत्री गोयल यांना प्रवाशाने सुनावलं, 'तुमच्यापेक्षा प्रभू चांगले होते' title=

मुंबई : माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू रेल्वे अपघात टाळण्यात अयशस्वी ठरले असले तरी ते आणि त्यांचं मंत्रालय सोशल मीडियावर अतिशय सक्रिय होतं. लोक फक्त माजी रेल्वेमंत्री प्रभु यांना रेल्वे समस्या ट्विट करायचे आणि लोकांना लगेच ते प्रतिक्रिया द्यायचे. पण प्रभू यांच्या राजीनाम्यानंतर रेल्वे मंत्रालय देखील आळशी झालं. 

नागपूर येथून प्रवास करणाऱ्या एका कुटुंबियांना रेल्वे मंत्र्यांना 45 ट्विट केले पण पियुष गोयल आणि त्यांच्या मंत्रालयाकडून कोणतीच मदत आली नाही. त्यानंतर या प्रवाशांने ट्विट करत म्हटलं की, तुमच्या पेक्षा तर सुरेश प्रभू चांगले होते जे प्रत्येक वेळेस मदतीसाठी तयार असायचे.

मोहन फकीरचंद हे पत्नी ज्योती आणि मुलासह नागपूर येथून कोटाला निघाले होते. त्यांचं तिकीट कन्फर्म नाही झालं. त्यांना रॅक बर्थ मिळाला पण तेथे आधीच काही लोकं बसले होते. त्यांना त्या जागेवर त्या व्यक्तीने बसू नाही दिलं आणि संपूर्ण प्रवास त्रास दिला. अनेक तास ते रेल्वेमध्ये टीसीला शोधत होते. पण त्यांना ते नाही मिळाले.

फकीरचंद यांनी त्यानंतर तब्बल 45 वेळा पियुष गोयल यांना ट्विट केलं पण त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. ६ तास त्यांच्या ट्विटला एकही उत्तर आलं नाही. त्यानंतर राग व्यक्त करत त्यांनी गोयल यांना म्हटलं की, तुमच्या पेक्षा प्रभू यांचं मॅनेजमेंट चांगलं होतं. जर ते आज मंत्री असते तर माझी समस्या सोडवली असती. त्यानंतर काही तासानंतर रेल्वेला जाग आली पण समस्या सोडवली की नाही याबाबत कोणतीही माहिती देण्यात नाही आली.