नितीश कुमार यांचे नवे 'भिडू' आज शपथ घेणार

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता हा मंत्रीमंडळ विस्तार होईल.

Updated: Jul 29, 2017, 12:34 PM IST
नितीश कुमार यांचे नवे 'भिडू' आज शपथ घेणार title=

पाटणा : बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता हा मंत्रीमंडळ विस्तार होईल. मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी यादी निश्चित केलीय.

एकूण ३२ मंत्री शपथ घेणार असल्याचं बोललं जातंय. यामध्ये भाजपच्या वाट्याला १४ मंत्रीपदं येणार असल्याची चर्चा आहे. तर जेडीयू आणि लोकजनशक्ती पक्षाच्या आघाडीला २ मंत्रीपदं मिळणार आहेत.

लोकजनशक्ती पक्षाकडून पशुपती पारस यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचं बोललं जातंय. याशिवाय अनेक नवीन चेह-यांचा या नितीश यांच्या मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.