मुंबई : नोटबंदीनंतर अनेक कंपन्यांना नुकसान झालं. नोटबंदीनंतर अनेक ठिकाणांहून काळापैसा बाहेर आला. पण नोटबंदीमध्ये एका कंपनीला फायदा झाल्याचं ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सने म्हटलं आहे.
कोटक महिंद्रा बँकेचे एमडी आणि भारतातील सर्वात श्रीमंत बँकर उदय कोटक यांच्या संपत्तीत यावर्षी ४३ टक्क्यांनी वाढली. त्यांची संपत्ती आता 64,812 कोटी रुपये झाली आहे. कोटक, नोटबंदी आणि इतर आर्थिक सुधार यामुळे लोकं रियल एस्टेट, बचत किंवा कॅश ठेवण्यापेक्षा बँकेच्या फायनॅंशियल असेट्समध्ये गुंतवणूक करणं अधिक पंसत करत आहेत. त्यामुळे कोटत महिंद्राला याचा मोठा फायदा झाला आहे.