Post Office : नवीन वर्षाची भेट, आजपासून पोस्ट ऑफिसमध्ये ठेवीवर जास्त व्याज

Higher interest on small savings plan deposits : केंद्र सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ करत सर्वसामान्यांना न्यू ईयर गिफ्ट दिले आहे.  

Updated: Jan 1, 2023, 07:26 AM IST
Post Office : नवीन वर्षाची भेट, आजपासून पोस्ट ऑफिसमध्ये ठेवीवर जास्त व्याज  title=

Post Office investment : केंद्र सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ करत सर्वसामान्यांना न्यू ईयर गिफ्ट दिले आहे. (Higher interest on small savings plan deposits) सरकारने नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट  (Post Office Term Deposits), ज्येष्ठ नागरिक बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ केलीय. मात्र पीपीएफच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आजपासून नवे व्याजदर लागू होणार आहेत. 

अर्थखात्याने काढलेल्या नोटिफिकेशननुसार जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठी काही सेव्हिंग स्कीमवरील व्याजदर 0.20 टक्के ते 1.10 टक्के वाढवण्यात आलेत. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडचे व्याजदर 7.1 टक्क्यांवर कायम आहेत. किसान विकास पत्राच्या व्याजदरात वाढ करण्यात आलीय. 123 महिन्यांसाठी किसान विकास पत्रावर 7 टक्क्यांवरुन 7.2 टक्के व्याजदर मिळणार आहे. त्यामुळे अल्प बचत योजनांचे जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठीचे व्याजदर जाहीर करण्यात आले आहेत. या नव्या निर्णयाचा अनेक गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळण्यास मदत मिळणार आहे. 

विविध अल्पबचत योजनांवरील नवे व्याजदर कसे आहेत?

नव्या निर्णयानुसार, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर (NSC) आज 1 जानेवारीपासून 7 टक्के दराने व्याज मिळणार आहे. सध्या एनएससीवर 6.7 टक्के व्याज आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर सध्याच्या 7.6  टक्क्यांऐवजी 8 टक्के व्याज मिळेल. एक ते पाच वर्षांच्या कालावधीसाठीच्या पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनेवरील व्याजदर 1.1 टक्क्यांनी वाढला आहे. दरम्यान, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची या निर्णयामुळं निराशा झाली आहे.

नवीन निर्णयानुसार, पोस्ट ऑफिसमधील मुदत ठेवींवर एक वर्षासाठी 6.6 टक्के, दोन वर्षांसाठी 6.8 टक्के, तीनसाठी 6.9 टक्के आणि पाच वर्षांसाठी 7 टक्के व्याज दिले जाईल. याशिवाय मासिक उत्पन्न योजनेत 6.7 टक्क्यांऐवजी आता 7.1 टक्के व्याज मिळणार आहे. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करणे लाभदायक ठरणार आहे.

 PPF च्या खातेदारांची निराशा

पीपीएफ ( PPF) आणि सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणूकदारांचा मात्र सरकारने निराशा केली आहे. या दोन्ही योजनांच्या व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदर 7.6 टक्के कायम ठेवण्यात आला आहे, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) वरील सध्याचा 7.1 टक्के व्याजदर आहे तोच राहणार आहे. याशिवाय बचत ठेवींवर वार्षिक 4 टक्के दरानं व्याज मिळत राहील.