Google वर काहीही सर्च करण्यापूर्वी ही बातमी वाचा; अन्यथा महागात पडेल

Google Search Engine: Google वर अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुम्ही सर्च केल्यावर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

Updated: Oct 30, 2022, 09:06 AM IST
 Google वर काहीही सर्च करण्यापूर्वी ही बातमी वाचा; अन्यथा महागात पडेल title=

Cyber Crime : आजकाल कोणतीही माहिती सर्च करायचे असल्यास Google चा सर्वाधिक वापर केला जातो. सर्व काही जाणून घेण्यासाठी लोक Google वापरतात. अगदी कुकिंग पासून ते ऑनलाईन खरेदीशी संबंधित सर्व गोष्टींची माहिती Google वर उपलब्ध असते. काही वेळेस तर आपण एखाद्या संस्थेचा मोबाईल नंबर सर्च करायचा असेल तर आपण Google चा वापर करतो. दरम्यान मुंबईत अशी एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामध्ये एका महिलेने Google वर नंबर Search केला अन् फसवणूकीची बळी पडली.  

 अनेकदा आपण कोणतेही संस्था, दुकान किंवा कोणत्याही सेवेसाठी Google वर संपर्क क्रमांक शोधत असतो. पण ही सवय चांगली नाही. गुगल सर्चमध्ये (Google Search) तुमच्या स्क्रीनसमोरचा असलेला नंबर खोटा असू शकतो. या बनावट क्रमांकावर अवलंबून राहून तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता. अशाप्रकार मुंबईत घडला असून मुंबईतील एका ४९ वर्षीय महिलेला फूड डिलिव्हरी अॅपवरून काहीतरी ऑर्डर करायचे होते. ऑर्डर देण्यासाठी त्या महिलेने अनेक वेळा 1000 रुपये दिले. मात्र पेमेंट करताना त्या महिलेचे पैसे परत परत फेल होत होते. त्यामुळे कंटाळून त्या महिलेने गुगलवर संबंधित दुकानाचा नंबर शोधला.

महिला फसवणुकीची बळी झाली 

नंबर मिळाल्यानंतर महिलेने पैसे भरण्यासाठी फोन केला. समोरच्या व्यक्तीने कॉल उचल्यानंतर त्या महिलेकडे क्रेडिट कार्डचे तपशील विचारले. एवढेच नाही तर त्या व्यक्तीने महिलेला तिच्या मोबाईलवर आलेल्या ओटीपी नंबरबद्दलही विचारले. महिलेला समजू शकले नाही आणि ओटीपी शेअर केला. OTP शेअर होताच महिलेच्या बँक खात्यातून 2,40,310 रुपये कापले गेले.

वाचा : 'या' राज्यात पेट्रोल महाग; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर 

पोलिसांनी दाखवली तत्परता

हा संपूर्ण प्रकार महिलेने पोलिसांना सांगितला. सुदैवाने महिलेने तत्परता दाखवल्याने महिलेचे 2,27,205 रुपये वाचले. अशा परिस्थितीत, हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे की Google वर दाखविण्यात आलेले सर्व नंबर खरे असतीलच असे नाही. दुकानाच्या अधिकृत वेबसाइटवरून ग्राहक सेवा क्रमांक किंवा संपर्क तपशील वापरणे हा एकमेव उपाय आहे.