ऑफिसच्या लॅपटॉपमध्ये चुकूनही करु नका हे काम, नाहीतर तुम्हालाच होईल त्रास

अनेकदा अनेक लोक त्यांच्या कामाच्या वेळी त्यांची वैयक्तिक कागदपत्रे किंवा त्यांच्या वैयक्तिक फाइल्स आणि वस्तू ऑफिसच्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करतात. 

Updated: Jul 24, 2022, 07:20 PM IST
ऑफिसच्या लॅपटॉपमध्ये चुकूनही करु नका हे काम, नाहीतर तुम्हालाच होईल त्रास title=

मुंबई : सध्याची बहुतेक कामं ही लॅपटॉप किंवा संगणकावर होतात. कोरोना महामारीनंतर कामाच्या पद्धतीत झालेल्या बदलामुळे अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देण्यास सुरुवात केली जेणेकरून गरज पडल्यास त्यांचे कर्मचारी घरून काम करू शकतील. अशा परिस्थितीत लहान, हॅण्डी आणि ट्रेंडी लॅपटॉप घेऊन जाण्याचा ट्रेंडही वाढला आहे. परंतु हल्ली लोकांनी या लॅपटॉपवर आपली वैयक्तिक कामे करण्यास सुरुवात केली आहे.

पण ऑफिसच्या लॅपटॉपवर वैयक्तीक काम करणं चुकीचं आहे. तुमच्या कंपनीला जर याबद्दल कळालं तर तुम्हाला ते महागात पडू शकतं.

चला तर जाणून घेऊ या की, ऑफिसच्या लॅपटॉपवर कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी करु नये. कारण पुढे जाऊन तुम्हाला ते महागात पडू शकते.

आता हेच बघा, असे बरेच लोक त्यांच्या शिफ्ट दरम्यान त्यांच्या ऑफिस लॅपटॉपवर इतर नोकऱ्या शोधू लागतात. परंतु तुम्हाला माहितीय का की तुमच्या ऑफिसच्या आयटी टीमला तुमच्या या गोष्टीबद्दल माहिती मिळू शकते. कारण बरेच असे ऑफिसेस आहेत, ज्यांची आयटी टीम कर्मचाऱ्यांच्या कामाला मॉनिटर करत असतात. त्यामुळे ऑफिस सिस्टीममधून नोकरी शोधणे किंवा आपला बायोडाटा कुठेतरी पाठवणे टाळावे.

अनेकदा अनेक लोक त्यांच्या कामाच्या वेळी त्यांची वैयक्तिक कागदपत्रे किंवा त्यांच्या वैयक्तिक फाइल्स आणि वस्तू ऑफिसच्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करतात. तर कोणीही हे करू नये, कारण यामुळे तुमच्या वैयक्तिक गोष्टी लीक होऊ शकतात.

बर्‍याच कार्यालयांचे स्वतःचे चॅट प्रोग्राम असतात, जेथे ते कंपनीच्या इतर कर्मचार्‍यांशी जोडलेले राहतात. त्याचबरोबर अनेक लोक त्यावर ग्रुप तयार करून लोकांशी वाईट किंवा चुकीचे काम करतात. परंतु अशी कृत्ये करणे देखील चुकीचे मानले जाते. हे बऱ्याचदा लोकांच्या अंगाशी येऊ शकतं.

बर्‍याच वेळा लोक शिफ्ट दरम्यान किंवा सुट्टीनंतर ऑफिसच्या लॅपटॉपमध्ये गुगलवर काही सामग्री शोधतात, जी आक्षेपार्ह असते. त्याच वेळी, काही लोक ऑफिसच्या लॅपटॉपवर पॉर्न पाहतात, त्यांनी हे अजिबात करू नये. त्याचप्रमाणे तुम्ही अशी कोणतीही लिंक ओपन करू नये ज्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता.

तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काय सर्च करत आहात याची माहिती ऑफिसच्या आयटी टीमला असते. अगदी तुम्ही त्याला डिलीट केलंत तरी, त्यांना ते कळू शकतं. म्हणूनच तुम्ही अशा कोणत्याही वेबसाइटचा शोध घेऊ नका ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल.