पाण्याचा वापर करुन असं ओळखा भेसळयुक्त तुप, पुन्हा कधीही होणार नाही तुमची फसवणूक

खरे देशी तूप पाण्यावरून ओळखता येते. परंतु ते कसं ओळखावं हे बऱ्याच लोकांना माहित नसतं, चला याबद्दल जाणून घेऊ या.

Updated: Jul 24, 2022, 07:18 PM IST
पाण्याचा वापर करुन असं ओळखा भेसळयुक्त तुप, पुन्हा कधीही होणार नाही तुमची फसवणूक title=

मुंबई : शुद्ध तूप आरोग्यासाठी चांगलं असल्याचं मानलं जातं, शिवाय शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठीही देखील त्याचा खूप उपयोग होतो. परंतु आजकाल सरास बनावट गोष्टी बनवल्या आणि बाजारात विकल्या जात आहेत. त्यामध्ये तुपाचा देखील समावेश आहे. तुप हे खूप महाग मिळते, त्यामुळे काही पैसे कमावण्यासाठी अनेक लोक बनावट तुप बाजारात विकतात. परंतु असे असेल तर तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल की, यामधील खरं तुप ओळखायचं कसं? तुम्ही काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे खरे तूप कसे ओळखायचे ते सांगणार आहोत.

अस्सल तूप कसे ओळखावे?

खरे देशी तूप पाण्यावरून ओळखता येते. अशा वेळी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात देशी तुपाचे दोन ते तीन थेंब टाका. ते तुप जर नकली किंवा बनावट असेल तर ते पाण्यात मिसळेल, पण जर तुप खरं असेल तर ते पाण्यावरती तरंगु लागेल.

तळहातावर तूप ठेवूनही तुम्ही ओळखू शकता. अशा स्थितीत देसी तूप तळहातावर ५ ते ६ मिनिटे ठेवा. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांनी त्याचा वास गोड आला तर समजून घ्या की ते खरे तूप आहे. परंतु जर त्याचा वास विचित्र येत असेल तर ते नकली तूप आहे असं समजा.

तूप हे उकळूनही खरं का खोटं ते ओळखता येतं. अशा स्थितीत तुम्ही एक ते दोन चमचे देशी तूप उकळा आणि त्यानंतर तूप २४ तास बाजूला ठेवा. जर तरी देखील त्याला चांगला वास येत असेल आणि तुप दाणेदार दिसत असेल, तर ते खरे तूप आहे. परंतु जर त्याला कसातरी वास आला तर सनजा की ते नकली तूप आहे.