Amol Kolhe : अमोल कोल्हे भाजपात जाणार?

संसदेत केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात टीकेच्या तोफा डागणारे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) पण शिरूरचे खासदार असलेल्या कोल्हेंनी अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली.

Updated: Oct 1, 2022, 11:51 PM IST
Amol Kolhe : अमोल कोल्हे भाजपात जाणार? title=

योगेश खरे-सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. कोल्हे शाहांना नेमकं कशासाठी भेटले, पाहूयात हा रिपोर्ट. (ncp mp amol kolhe meet home minister amit shah see full report)

संसदेत केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात टीकेच्या तोफा डागणारे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे पण शिरूरचे खासदार असलेल्या कोल्हेंनी अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. अमोल कोल्हे देखील भाजपात जाणार की काय, असा प्रश्न अनेकांना पडलाय.

कोल्हेंचीही भाजपात 'गरुडझेप'?

कोल्हेंच्या शिरूर लोकसभा मतदारसंघावर सध्या भाजपनं लक्ष केंद्रीत केलंय. केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंग यांच्यावर शिरुरची जबाबदारी सोपवण्यात आलीय. गेल्या 13 सप्टेंबरला त्यांनी शिरूरमध्ये येऊन आढावा घेतला. शिरूरमध्ये पुढचा खासदार भाजपचा असेल, असं त्यांनी यावेळी जाहीर केलं. शिंदे गटात सामील झालेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठीही हा मोठा धक्का होता. या पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी अमित शाहांची भेट घेतल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलंय.

दरम्यान, अभिनेते असलेल्या अमोल कोल्हेंचा शिवप्रताप गरुडझेप हा चित्रपट येत्या 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय.  हा चित्रपट पाहण्याचं निमंत्रण देण्यासाठी कोल्हे अमित शाहांना भेटल्याचं सांगितलं जातंय. हा दावा कितपत खरा आहे? हे लवकरच कळेल. खासदारकी वाचवण्यासाठी अमोल कोल्हे खरंच भाजपात गरुडझेप घेणार का? पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त.