NDA मिटिंगमध्ये अमित शहांनी सगळ्यांसोबत हात मिळवला, पण 'त्या' खासदाराच्या पाठीवर कौतुकाची थाप, कोण आहे तो नेता

NDA Meeting: आज एनडीए सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. मात्र, त्यापूर्वी दिल्लीत एनडीएची बैठक सुरू आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 7, 2024, 01:05 PM IST
NDA मिटिंगमध्ये अमित शहांनी सगळ्यांसोबत हात मिळवला, पण 'त्या' खासदाराच्या पाठीवर कौतुकाची थाप, कोण आहे तो नेता title=
Narendra Modi Amit Shah met Suresh Gopi shake hand NDA Leaders

NDA Meeting: भाजपप्रणित एनडीए तिसऱ्यांदा केंद्रात सरकार बनवण्यास यशस्वी होत आहे. आज जुन्या संसद भवनात एनडीएच्या नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीत नरेंद्र मोदी यांना एनडीए नेतेपदी निवड होणार आहे. त्यानंतर एनडीए सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. या प्रसंगी एनडीएच्या बैठकीला सर्व नेते उपस्थित आहेत. जुन्या संसद भवनात असलेल्या या बैठकीला वेळेच्या आधीच गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित होते. यावेळी ते संसदेत उपस्थित असलेल्या भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची भेट घेत होते. तसंच, एनडीएच्या नेत्यांचीही त्यांनी भेट घेतली. यावेळी एक वेगळाच प्रसंग घडला आहे. 

एनडीएच्या बैठकीतील वेगळाच नजारा

एनडीएच्या बैठकीत दरम्यान गृहमंत्री अमित शाह भाजपच्या नेत्यांसोबतच घटक पक्ष असलेल्या एनडीएच्या इतर नेत्यांसोबत भेटत होते. त्यांना भेटून हात मिळवून त्यांचे अभिवादन करत होते. अचानक तिथे केरळात भाजपमध्ये पहिल्यांदा कमळ फुलवणारे साउथचे सुपरस्टार आणि अभिनेता ते नेता असा प्रवास करणारे सुरेश गोपी यांची एन्ट्री झाली. केरळमध्ये भाजपचा दुष्काळ संपवणाऱ्या सुरेश गोपी यांनी पहिले शाह यांची भेट घेतली त्यानंतर त्यांच्यासोबत हात मिळवला. त्यानंतर अमित शाह यांनी त्यांची पाठ थोपटून त्यांचे कौतुक केले आहे. केरळात इतिहास रचणाऱ्या या खासदाराची दोन वेळा पाठ थोपटून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि सुरेश गोपी यांचा उत्साह वाढवला. 

कोण आहेत सुरश गोपी?

केरशच्या त्रिशूर जागेवरुन अभिनेता सुरेश गोपी यांनी विजय मिळवला आहे. त्यांचा जन्म 1958 साली केरळच्या अलप्पुझामध्ये झाला आहे. गोपी यांनी 74,686 मतांनी त्रिशूप जागेवरुन विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयाने केरळात भाजपने एन्ट्री केली आहे. त्यांनी माजी राज्य मंत्री आणि भाकपचे नेते वीएस सुनील कुमार यांचा पराभव केला आहे. काँग्रेस येथे तिसऱ्या नंबरवर आहे. 

मल्याळम चित्रपटातील अभिनेत्याची राजकारणात एन्ट्री

सुरेश गोपी ऑक्टोबर 2016 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. गोपी यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्रिशुर मतदारसंघातून परभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर 2021मध्ये विधानसभा निवडणुकांमध्येही पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यांनी हार मानली नाही. अखेर लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये त्यांनी भाजपचा झेंडा फडकावला. 

सुरेश गोपी यांनी 32 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये जवळपास 250 चित्रपटात काम केले आहे. अभिनयाबरोबरच ते प्लेबॅक सिंगर म्हणूनही काम करतात. तामिळ, तेलगु, कन्नड आणि हिंदी चित्रपटात त्यांनी अभिनय केला आहे. त्यांची थलास्तानम चित्रट खूप चालला होता. 1997 मध्ये आलेला लेलम चित्रपटातील त्यांची भूमिका खूप गाजली होती. त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानीत करण्यात आले आहे.