तुम्ही कधी नाग नागिणीचा रोमान्स पाहिलाय का? पाहा हा अद्भूत VIDEO

आतापर्यंत तुम्ही सोशल मीडियावर नाग-नागिणीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

Updated: Aug 2, 2022, 01:18 PM IST
तुम्ही कधी नाग नागिणीचा रोमान्स पाहिलाय का? पाहा हा अद्भूत VIDEO   title=

Viral Video -  साप म्हटलं की लोकांच्या मनात भीती निर्माण होते. मात्र नागपंचमीच्या (Nag Panchami 2022) दिवशी या नागाची पूजा केली जाते. आज नागपंचमी आहे अशात नाग-नागिणीचा एक मंत्रमुग्ध करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला यूजर्स वारंवार बघत आहेत. आतापर्यंत तुम्ही सोशल मीडियावर नाग-नागिणीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

नाग-नागिणींचं अनोखं रुप

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नाग आणि नागिणीची जोडी एकमेकांना आलिंगन घेत आहेत. हे अगदी रोमांचक दृष्य क्वचितच तुम्ही पाहिलं असेल. एका शेतात नाग-नागिणींचा रोमान्स पाहिला मिळतो आहे. व्हिडीओमधील नाग-नागिण जवळपास 8 फूट लांबीचे आहेत असं दिसतं. या व्हिडीओमध्ये नाग आणि नागिणीचं एक अनोख प्रेम पाहिला मिळतं. महाराष्ट्रातील काही भागात या नाग-नागिणीच्या या दृष्याला फळण, जुळण असंही म्हटलं जातं.

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम शेअर करण्यात आला आहे.  'snake._.world' या नावाच्या अकाउंटवर हा व्हिडिओ पाहिला मिळतो. या व्हिडीओला आतापर्यंत असंख्य यूजर्सने वारंवार पाहिला आहे. तर 4 हजारापेक्षा जास्त यूजर्सने तो लाइक केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by SNAKE WORLD(@snake._.world)