Reliance Jio : मुकेश अंबानींनी एका रुपयात बिघडवला Vi चा खेळ, रोज मिळेल 2GB डेटा; Airtel युझर्सनाही फटका

Jio New Prepaid Plan : मुकेश अंबानीने 1 रुपयाने बदलवला सारा खेळ. आतापर्यंत ही गोष्ट Vi किंवा Airtel ला देखील जमलेली नाही. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 2, 2024, 02:28 PM IST
Reliance Jio : मुकेश अंबानींनी एका रुपयात बिघडवला Vi चा खेळ, रोज मिळेल 2GB डेटा; Airtel युझर्सनाही फटका title=

Reliance Jio आणि Vodafone Idea आपल्या युझर्सला कॉम्पिटिटिव प्लान ऑफर करत आहेत. ज्यामध्ये युनिक बेनिफिट्सचा पण समावेश आहे. अगर आप लाँग वॅलिडिटी प्लान बघत आसल तर Jio चा 999 रुपयांचा प्लान सर्वांच्या आवडीचा ठरु शकते. हा प्लान Vodafone Idea च्या 998 रुपयाच्या प्लानला थेट स्पर्धा म्हणूनच आणला आहे. यामध्ये तुलनात्मक पाहिलं तर Jio चा प्लान सर्वाधिक चांगला आहे. 

Jio चा 999 चा प्रिपेड प्लान 

जिओचा 999 रुपयांचा प्लॅन 98 दिवसांची सेवा देतो, जो 84 दिवसांच्या Vodafone-Idea च्या 998 रुपयांच्या प्लॅनपेक्षा 14 दिवस अधिक आहे. फक्त आणखी 1 रुपयात, Jio युझर्सना 2GB डेली डेटासह भरपूर ऑफर्स मिळतात. याव्यतिरिक्त, जिओ युझर्सना अमर्यादित 5G डेटा ऑफर करते, ज्यांना ऍट्रॅक्टिव ऑप्शन आहेत तसेच फास्ट इंटरनेट स्पीड्स दिले आहेत. या प्लानमध्ये सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉल, दररोज 100 फ्री एसएमएस आणि Jio सिनेमा, Jio Tv आणि Jio क्लाऊड सारख्या Jio सर्व्हिसकरिता फ्री एक्सेसचा समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे Jio सिनेमा प्रीमियम करिता फ्री एक्सेसचा समावेश नाही. 

Vi चा 998 चा प्रिपेड प्लान 

तर दुसरीकडे Vodafone Idea चा Vodafone-Idea चा Rs 998 प्लॅन काही अनोख्या फायद्यांसह येतो, ज्यामध्ये Binge All Night फीचरचा समावेश आहे, जे वापरकर्त्यांना मध्यरात्री ते सकाळी 6 पर्यंत अमर्यादित डेटाचा आनंद घेऊ देते. हे वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाइट्स देखील ऑफर करते, जे वापरकर्त्यांना वीकेंडपर्यंत न वापरलेला डेटा ठेवण्याची परवानगी देते. याव्यतिरिक्त, Vodafone-Idea च्या प्लॅनमध्ये लोकप्रिय OTT ॲप SonyLIV चे मोफत 84-दिवसांचे सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे, जे वापरकर्त्यांसाठी अधिक मनोरंजन पर्याय जोडते. Airtel बद्दल बोलायचे झाले तर त्यांच्याकडे 979 रुपयांचा प्लान देखील आहे, ज्याची वैधता 84 दिवसांची आहे. दररोज 2GB डेटा आणि 100 SMS ऑफर केले जातात. जर तुम्हाला डेटा आणि वैधता हवी असेल तर Jio चा प्लान चांगला आहे, पण तुम्हाला OTT कंटेंट आणि इतर डेटा फायदे हवे असतील तर Vodafone-Idea चा प्लान चांगला पर्याय आहे.