MP News : जरा कल्पना करा, तुम्ही गाढ झोपेत आहात आणि आजूबाजूला काय सुरुय याची तुम्हाला काहीच कल्पना नाही. तितक्यात तुमच्या उशीजवळ एक मोठा किंग कोब्रा बसला आहे हे कळलं तर मग तुमची काय अवस्था असेल? याचा विचार करूनच तुम्ही थरथर कापाल. पण हे प्रत्यक्षात घडलं आहे. मध्य प्रदेशात हा सगळा प्रकार घडला. पती झोपेत असताना पत्नीला हा भलामोठा साप दिसला. त्यानंतर पत्नीने पतीला उठवलं आणि घरातला साप दाखवला. जेव्हा पतीने उशीमागे साप पाहिला तेव्हा त्यालाही घाम फुटला. शेवटी सर्पमित्राने या सापाला सुरक्षित पकडून जंगलात सोडून दिले आहे.
सागरच्या पाटकुई बरारू गावातील दृष्य सर्वजण हादरून गेले आहेत. डॉक्टरांच्या फार्म हाऊसमध्ये सुनील नावाचा चौकीदार आपल्या कुटुंबासह राहतो. सुरक्षारक्षक सुनील जमिनीवर झोपला होता आणि त्याच्या उशाजवळ 6 फूट लांब कोब्रा फणा पसरून बसला होता. तितक्यात सुरक्षारक्षकाची बायको त्याला जेवायला बोलवायला आली आणि तिने पतीच्या डोक्याजवळ साप पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने झोपलेल्या पतीचे पाय धरले आणि त्याला खाली खेचले आणि मग त्याला उठवले. तिने उशीच्या मागचे दृश्य पतीला दाखवले तेव्हा त्यालाही धक्काच बसला.
फार्म हाऊसचे मालक डॉ.यशपाल यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी सर्पमित्र मोहम्मद असदला फोन केला. मोहम्मद असद बररू गावात पोहोचला आणि फार्म हाऊसवरील चौकीदाराच्या खोलीत गेला. त्यावेळी त्याला उशीच्या मागे कोब्रा बसलेला दिसला. मोहम्मदने नागाला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने अनेकवेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या परिश्रमानंतर मोहम्मदने या कोब्राला ताब्यात घेतले. मोहम्मद असदने अत्यंत सावधरितीनेकोब्रा पकडला आणि नंतर तो एका बरणीत भरुन जंगलात सोडला. दुसकीडे एका पत्नीच्या बुद्धीने पतीचे प्राण वाचले.
दरम्यान, सर्पमित्र मोहम्मद असदने सांगितले की, थंडीच्या दिवसात आपण अनेकदा काळजी घेतली पाहिजे. रात्री शेतात जाताना टॉर्चचा वापर करा. घराभोवती अस्वच्छता ठेवू नका. तुमचे घर डोंगराळ किंवा सपाट भागाला लागून असेल तर नेहमी सतर्क रहा. विशेषत: अशा हवामानात वेलींची काळजीपूर्वक काळजी घ्यावी आणि त्यांची लागवड करावी आणि शक्य असल्यास कडुनिंबाचाही धूर करावा. त्यामुळे पहिले म्हणजे डासांपासून आराम मिळेल आणि दुसरे म्हणजे असे जीव घरात येणार नाहीत.