१२ वीच्या निकाला आधीच ४ लाखाहून अधिक विद्यार्थी नापास

म्हणून लाखो विद्यार्थी झाले नापास

शैलेश मुसळे | Updated: Apr 16, 2018, 07:55 AM IST
१२ वीच्या निकाला आधीच ४ लाखाहून अधिक विद्यार्थी नापास title=

नवी दिल्ली : १० वी आणि १२ वीच्या निकालाची सगळ्यांनाच उत्सूकता असते. १० वी आणि १२ वीच्या परीक्षा झाल्यानंतर आता निकालाची वाट पाहिली जात आहे. पुढच्या आठवड्यात निकाल लागणार आहे पण त्याआधीच 12वीचे 4,69,279 विद्यार्थी नापास झाल्याची माहिती पुढे आली आहे. कारण या विद्यार्थ्यांनी परीक्षा मध्येच सोडून दिली होती. बोर्डाच्या नियमानुसार १२वीच्या एकही पेपर फेल झाला तरी तो सर्व विषयात मानला जातो. त्यामुळे ज्या-ज्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण पेपर नाही दिलेत ते नापास झाले आहेत.

काय आहे प्रकरण 

11,29,786 विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्धवट सोडली. पण यामध्ये हायस्कूलचे 6,60,507 विद्यार्थी आहेत. हायस्कूलच्या नियमानुसार ५ विषय पास झाले तरी पास मानलं जातं. त्यामुळे सगळे पेपर न देणाऱ्यांपैकी किती विद्यार्थी पास होतील हे सांगणं कठीण आहे. १० वीचे विद्यार्थी देखील मोठा संख्येत नापास होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश बोर्डातील हे प्रकरण आहे.

एका वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, हायस्कूल आणि इंटरमीडिएट परीक्षेचा निकाल 28 ते 30 एप्रिलमध्ये लागू शकतो.