मनी प्लानिंग : असे करा खर्च , असा वाचवा पैसा

कुठे आणि कसा पैसा खर्च करायचा याची शिस्त लागणे महत्त्वाचे असते. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 24, 2017, 04:09 PM IST
मनी प्लानिंग : असे करा खर्च , असा वाचवा पैसा title=

मुंबई : प्लानिंग करुन जर तुम्ही पैसा खर्च केलात तर तुमच्याकडे खूप सारी रक्कम शिल्लक राहू शकते. खर्च हा फायनांशिअल प्लानिंगचा महत्तपूर्ण हिस्सा आहे. पण कुठे आणि कसा पैसा खर्च करायचा याची शिस्त लागणे महत्त्वाचे असते. 

आर्थिक नियमांचे पालन

यासाठी तुम्हाला शिस्तबद्ध पद्धतीने आर्थिक नियमांचे पालन करावे लागेल. तुमच्याकडे शिल्लक रक्कम गुंतविल्यास खूप मोठा रिटायर्टमेंट प्लान तयार होऊ शकतो. यातील काही गोष्टी आपण जाणून घेऊया.

खर्च करण्याआधी...

आपल्या प्रत्येक वैयक्तिक खर्चासाठी प्लानिंग गरजेचे आहे. सर्व खर्चांची एक यादी तयार करायला हवी.  वस्तूंच्या महत्त्वानुसार त्यांना प्राथमिकता द्यायला हवी. सर्वात महत्त्वपूर्ण खर्च यादीत वर राहतील. त्यापेक्षा कमी महत्त्वाचे खर्च असे अनूक्रमे लिहायला हवे. 

किती रक्कम शिल्लक?

गुंतवणूक केल्यानंतर, विमा हप्ता दिल्यानंतर, कर्ज दिल्यानंतर आणि इतर आवश्यक बिलांचे पैसे दिल्यानंतर इतर गोष्टींवर खर्च करण्यासाठी तुमच्याकडे किती रक्कम उरते हे लिहून ठेवा.

अशी वाचवा रक्कम 

आता वरील यादीत सर्वात वर लिहिलेल्या वस्तूसाठी पैसे बाजूला काढून ठेवा. सर्वात खाली लिहिलेल्या वस्तूसाठी खर्च करणे गरजेचेच आहे का ? याचा विचार करा. तो खर्च टाळून ही रक्कम वाचवू शकता. 

वळा इतर गरजांकडे 

ही रक्कम खर्च करण्याऐवजी गुंतवणूक करा. आपल्या गुंतवणूकीच्या गरजा पूर्ण करा त्यानंतर इतर गरजांकडे वळा. त्यानंतर उरलेल्या पैशातून मौजेच्या वस्तू घेऊ शकता.

असा वाचवा पैसा

जास्तीत जास्त पैसे वाचविण्यासाठी डिस्काऊंट ऑफर्सचा लाभ घ्या. एखाद्या वस्तूची ऑनलाईन किंमत जाणून घ्या. क्रेडिट कार्ड कॅशबॅक ऑफरचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. 

प्लानिंग करा 

मोठी खरेदी करण्याचे आधी प्लानिंग करा व तसे पैसे साठवून ठेवा. उदा. मोठ्या फॅमिली पिकनिकला जाण्याआधी एक वर्ष आधीपासूनच सेव्हिंग करायला सुरुवात करा. यामूळे तुम्हाला पैशांचे ओझे कमी वाटेल. 

हा पैसा गुंतवल्यास अतिरिक्त व्याजही मिळेल आणि खर्च करण्यासाठी जास्त रक्कमही जमा होईल. 

क्षमेतेपेक्षा अधिक खर्च ?

आपल्याला होत असलेल्या कमाईपेक्षा जास्त रक्कम खर्च केल्यावर तुम्ही आर्थिक संकटात सापडू शकता. 

पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड हे आपल्याला क्षमेतेपेक्षा अधिक खर्च करण्यास प्रेरित करतात. या जाळ्यात अडकून आपण अशा वस्तूदेखील घेतो ज्यांची आपल्याला गरज देखील नाही.

पण  त्यांचे हफ्ते भरणे ही मोठी चिंता होऊन जाते.

क्रेडिट कार्डचा वापर  

क्रेडिट कार्डचा वापर हा डिस्काऊंट ऑफर, कॅशबॅक, रिवॉर्ड पॉईंट्स इ. लाभ उठविण्यासाठीच करायला हवा. 

पर्सनल लोनचा वापरही खूपच महत्त्वाच्या गरजेसाठीच करायला हवा. 

तुमच्या सवयींकडे लक्ष द्या

आपल्याला खर्च करण्याची सवय लागली आहे हे अनेकांना समजण्यासाठी उशीर होतो. त्यामूळे खर्चात वाढ होत राहते. 

आपल्या खर्च करण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करु नका.

जर आर्थिक सल्लागाराकडून जर हे प्लानिंग केलात तर जास्त सोयिस्कर ठरु शकते.