मुजप्फरनगर : सरकार आणि घटनेनं परवानगी दिली, आणि शत्रूशी लढण्याची वेळ आलीच तर अवघ्या तीन दिवसात संघाचे स्वयंसेवक तयार असतील, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय.
मोहन भागवत उत्तर प्रदेशातल्या मुज्जफरनगरमध्ये संघाच्या शिबिरात बोलत होते. शत्रूशी युद्ध पुकारण्याची वेळ आली,तर लष्कराला तयारीसाठी सहा ते सात महिने लागू शकतात.
पण संघाची शिस्त निमलष्करी दलाप्रमाणे आहे. त्यामुळे कायद्यानं परवानगी दिली, तर संघाचे स्वयंसेवक अवघ्या तीन दिवसात लढाईसाठी तयार होऊ शकतात असं भागवतांनी म्हटलंय.