'साफ नियत और सही विकास... मोदी सरकारचा नवा नारा

मोदी सरकारला 26 मे रोजी 4 वर्षे पूर्ण

Updated: May 25, 2018, 06:24 PM IST
'साफ नियत और सही विकास... मोदी सरकारचा नवा नारा  title=

मुंबई : नरेंद्र मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्तानं भाजपनं मोठ्या सोहळ्याची तयारी केलीये. 'साफ नियत और सही विकास, फिर एक बार मोदी सरकार'  २०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदी सरकारचा हा नारा आहे. या घोषवाक्यासह भाजप आनंदोत्सव साजरा करणार आहे. सरकारच्या योजना आणि कामे जनतेपर्यंत पोचवली जाणार आहेत.

ओडीशा राज्यातील कटकमध्ये शनिवारी २६ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी एका जाहीर सभेत संवाद साधणार आहेत. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारच्या कामांची माहिती देणार आहेत.  २६ मे पासून ते ११ जूनपर्यंत देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी स्वत: या सर्व कार्यक्रमांना अंतिम रुप दिलंय.

भाजपच्या सर्व खासदारांना या काळात बुथ संपर्क अभियान चालवण्याच्या सूचना करण्यात आल्यात.  केंद्रीय मंत्री या पंधरवड्यात देशभरात ४० पत्रकार परिषद घेऊन सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोचवणार आहेत.