नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामधली बैठक संपली आहे. या दोघांमध्ये तब्बल पाच तास चर्चा झाली आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजना आणि उद्योगस्नेही धोरण या योजनांचं कौतुक केलं.
पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याबरोबरही बैठक झाली. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, नारायण राणेंचा भाजप प्रवेश आणि प्रकाश मेहतांवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप यावर चर्चा झाली.