कापूस उत्पादनात वाढ होण्याची चिन्हे

देशात २०१६/१७ या आर्थिक वर्षात देशात कापूस चांगलाच पीकला त्यामुळे कापसाचे उत्पादन ३.७६ टक्क्यांवरून ३४५ लाख गाठींवर पोहोचण्याची शक्यता आहे. एक गाठ १७० किलोग्रॅमची असते.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 21, 2017, 11:09 PM IST
कापूस उत्पादनात वाढ होण्याची चिन्हे title=

नवी दिल्ली : देशात २०१६/१७ या आर्थिक वर्षात देशात कापूस चांगलाच पीकला त्यामुळे कापसाचे उत्पादन ३.७६ टक्क्यांवरून ३४५ लाख गाठींवर पोहोचण्याची शक्यता आहे. एक गाठ १७० किलोग्रॅमची असते.

२०१५/१६ मध्ये कापसाचे उत्पादन ३३२ लाख गाठी इतके होते. कॉटन एडवायजरी बोर्डाच्या आयुक्त कविता गुप्ता यांनी ही माहिती दिली.
कविता गुप्ता यांनी सांगितले की, यंदा कापूस शेती अगदीच मर्यादीत जमीनीवर करण्यात आली. तरीसुद्धा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाचे उत्पादन चांगले झाले. २०१६/१७ या वर्षात ३४५ लाख गाठी कापसाचे उत्पादन होईल अशी आशा आहे. दरम्यान, हरियाणात व्हाईट फ्लाई आणि गुजरातमध्ये पिंक बॉल रोगाने कापसावर हल्ला केला. तरीसुद्धा कापसाचे उत्पादन चांगलेच राहिले आहे, असेही गुप्ता म्हणाल्या.